Latest

Bigg Boss 15: अफसाना-शमिता शेट्टीचा Kissing Video व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

बिग बॉस-१५ (Bigg Boss 15) कार्यक्रमाला सुरुवात झालीय. बिग बॉसच्या घरात काय काय घडणार, काय दंगा मस्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. घरात स्पर्धकांना दिले जाणारे टास्क कुठले असतील आणि स्पर्धक ते कशा पध्दतीने पार पाडतील, याकडेही प्रेक्षकांचे लक्ष आहे. टास्कमध्ये प्रचंड मेहनत घेणारे स्पर्धक मोकळ्या वेळेत काय करतात? तर फावल्या वेळेत हे स्पर्धक मज्जा मस्ती दंगा करतात. असाचं एक प्रसंग स्पर्धक शमिता शेट्टी आणि अफसाना यांच्याविषयी घडलायं. Bigg Boss 15 च्या घरातील अफसाना आणि शमिता शेट्टी यांचा किसिंग व्हिडिओ व्हायरल झालाय.

स्पर्धकांमधील मैत्री, त्यांच्या गप्पा किंवा मजा मस्ती करतानाचे फोटो व्हिडिओवर व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये अफसाना ही शेट्टीला किस करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ कलर्सने अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये स्पर्धक फावल्या वेळेत गप्पा मारताना दिसत आहेत. यावेळी अचानक अफसाना शमिताला वर उचलून घेते. नंतर तिला ती किस करते. एका तरुणीने चक्क अभिनेत्री शेट्टीला किस केल्यामुळे हा व्हिडिओ चर्चेत आलाय.

'बिग बॉस'च्या घरातील ड्रामा क्वीन म्हणून अफसानाकडे पाहिलं जातं. अफसाना चेष्टा करायला जाते. तिच्या अंगात राक्षस आल्याचं म्हणत ती नाटक करते. त्यामुळे अंगात आलेल्या राक्षसाला शेट्टीला किस करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं ती म्हणते. आणि अफसाना तिला किस करते.

कोण आहे अफसाना?

अफसाना ही पंजाबी गायिका आहे. तिला बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून आठवड्याला १० लाख रुपये मानधन मिळत असल्याचं म्हटलं जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT