Latest

वंडर फ्रूट ‘खजूर’ खाल्‍ल्‍याने होतात हे १० फायदे

निलेश पोतदार

खजूर हे आरोग्‍यासाठी अतिशय उत्‍तम मानले जाते. हिवाळ्यात खजूर खाल्‍ल्‍याने शरीराला अधिक लाभ होतो. वंडर फ्रूट 'खजूर'मध्ये लोह, मिनरल्‍स, कॅल्‍शियम, अमिनो ॲसिड, फॉस्‍फारस आणि व्हिटॅमिन्स असल्‍यान याला वंडर फ्रूट म्‍हटले जाते. काही लोकांना ताजे खजूर खायाला आवडतात. तर काही लोक दुधासोबत त्‍याचे शेक बनवून पिणे पसंद करतात. चला तर मग जाणून घेउयात हिवाळ्यात खजूर खाण्याचे काय फायदे होतात…

कॅन्सर, हृदयाशी संबंधीत व्याधी ठेवते दूर…

ग्‍लूकोज आणि फ्रक्‍टोलचा खजूर खजिना आहे. इम्‍यून पॉवरला ते बुस्‍ट करते. यामध्ये कोलेस्‍ट्रोल नसते. खजूरमधून २३ कॅलरीज मिळतात. तसेच ते सेल डॅमेज, कॅन्सरशी वाचवते. हृदयाशी संबंधीत व्याधींपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर आहे.

शरीराला उष्‍ण ठेवण्यास मदत…

खजुरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, लोह, कॅल्‍शियम, व्हिटॅमिन्स आणि मॅग्‍नेशियम असते. हिवाळ्यात खजूर खाणे शरीरासाठी उपयुक्‍त असते. खजूर शरीराला उष्‍ण ठेवण्यास मदत करते. खजूर शरीराला उर्जा प्रदान करते.

हाडे मजबूत करते…

वाढत्‍या वयात हाडे ठिसूळ किेंवा कमकुवत होण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी खजूर खाण्यामुळे फायदा होतो. खजूर हाडांना मजबूत करते. खजुरामध्ये मॅगनीज, कॉपर आणि मॅग्‍नेशियम आढळते.

त्‍वचेला सुंदर बनवते…

खजुराच्या नियमित सेवनाने त्‍वचेसंबंधीच्या व्याधींमध्ये फायदा होतो. त्‍वचेला कोमल आणि मुलायम बनवते. खजुरामध्ये अँटी एजिंग गुण असतात. खजुराच्या सेवनाने अकाली वृद्धत्व दिसून येत नाही.

दम्यामध्ये आराम…

दमा हा अतिशय जीवघेणा आजार आहे. दम्‍याच्या रूग्‍णांना थंडीच्या दिवसात श्वास घेण्यात अडचण येते. रोज २ ते ३ खजूर खाण्याने दम्‍यातील लोकांना या विकारात आराम पडू शकतो.

पचन सुधारण्यासाठी प्रभावी…

खजुरा मध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. खजुराच्या सेवनाने पचन प्रक्रिया सुधारते. यासोबतच पचनक्रियेसंबंधीची तक्रारही दूर करते. रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने अॅसिडिटीपासून आराम मिळतो.

रक्तदाब नियंत्रण…

खजुरामधील मॅग्‍नेशियम आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रण करते. नियमित ५ ते ६ खजूर खाल्‍ल्‍याने ब्‍लड प्रेशरच्या रूग्‍णांना फायदा होतो.

बद्धकोष्ठतेपासून आराम…

खजुरामध्ये फायबर आढळते. बद्धकोष्‍ठतेच्या समस्‍या दूर करते. यासाठी काही खजूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी उठल्‍यावर खजूराला बारीक करून शेक बनवून रिकाम्‍या पोटी प्यावे. यामुळे बद्धकोष्‍ठतेची समस्‍या दूर होण्यास मदत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT