Latest

भुसावळ : एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरी जळून खाक

backup backup

जळगाव, पुढारी ऑनलाईन : भुसावळ शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या केमिकल फॅक्टरीला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे.

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. परंतु, याला अजून कुणीही दुजोरा दिलेला नाही. आग लागताच कंपनीतून आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्याने कामगारांसह नागरिकांची एकच धावपळ सुरू झाली होती.

नागरिकांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती कळवल्यानंतर दीपनगर आणि भुसावळ पालिकेच्या बंबाने घटनास्थळी धाव घेतली. रेल नीर प्रकल्पाजवळील एफ-२१ येथे ज्वलनशील केमिकल बनवणारी फॅक्टरी आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

हे वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT