पुढारी ऑनलाईन डेस्क : भारच हा सर्वात जास्त अँड्रॉइड ट्रोजन डिटेक्शन क्लोन केलेल्या देशांपैकी एक आहे, असे एका अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. व्हॉट्सअॅपचे एक थर्ड-पार्टी अनऑफिशियल व्हर्जन अर्थात व्हॉट्सअॅपचा (WhatsApp) क्लोन हे देशातील लोकांच्या चॅटवर हेरगिरी करण्यात अग्रेसर आहे. असा या नव्या अहवालात हा इशारा देण्यात आला आहे.
सायबर-सुरक्षा फर्म ESET च्या अहवालानुसार, गेल्या चार महिन्यांत शोधण्यात आलेल्या अँड्रॉइड स्पायवेअर मधील एक 'GB WhatsApp' (WhatsApp चे लोकप्रिय पण क्लोन केलेले थर्ड पार्टी व्हर्जन) हे आहे. या अॅपमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसह हेरगिरी करण्याची क्षमता आहे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे याचा धोका आहे असे अहवालात स्पष्ट केले आहे.
मे ते ऑगस्ट 2022 पर्यंत 'मोजी' नावाचे सर्वात मोठे इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) बॉटनेट बनवणाऱ्या बॉट्सच्या भौगोलिक स्थानाच्या बाबतीत, भारत (35 टक्के) चीननंतर (53 टक्के) दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीन आणि भारत या दोन्ही देशामध्ये अंतर्गत भौगोलिक स्थान असलेल्या IoT बॉट्सची सर्वात जास्त संख्या आहे. पुढे या अहवालात असे म्हटले आहे की, "मोजी' बॉटनेट ऑटोपायलटवर आहे. 2021 मध्ये त्याच्या निर्मात्याला अटक झाल्यामुळे ते मानवी पर्यवेक्षणाशिवाय कार्यरत आहे."
ESET चे मुख्य संशोधन अधिकारी रोमन कोव्हॅक म्हणाले की, "रशिया हा देखील तो देश होता जो रॅन्समवेअरवर सर्वाधिक लक्ष बनलेला होता. राजकीय किंवा वैचारिकदृष्ट्या युद्धाने प्रेरित होऊन ही हेरगिरी करण्यात आली होती. युजर्संना याद्वारे आलेल्या धमक्यांचा अभ्यास केल्यानंतर याचा अभ्यास करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा