Latest

Bengaluru Crime | बंगळूर हादरले! बेरोजगार बापाने दोन वर्षांच्या मुलीला संपवले, म्हणे, खाऊ घालण्यासाठी पैसे नाहीत

दीपक दि. भांदिगरे

कोलार; पुढारी ऑनलाईन : आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेले बंगळूर शहर एका घटनेने हादरले आहे. एका ४५ वर्षीय व्यक्तीने त्याच्या दोन वर्षांच्या मुलीची कथितपणे हत्या केली आहे. पोटच्या मुलीला मारून टाकण्याचे त्याचे कारण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. त्याने दावा केला आहे की त्याच्याकडे त्याच्या मुलीला खाऊ घालण्यासाठी पैसे नाहीत. त्याने मुलीची हत्या केल्यानंतर स्वतः जीवन संपविण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Bengaluru Crime)

कोलार तालुक्यातील केंदट्टी गावातील तलावात दोन दिवसांपूर्वी दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. तसेच तलावाच्या काठावर निळ्या रंगाची कारही सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती स्थानिकांनी कोलार ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी आरोपीला त्याच्या मुलीच्या खून प्रकरणी अटक केली आहे.

राहुल परमार असे आरोपीचे नाव असून तो गुजरातचा आहे. तो दोन वर्षांपूर्वी पत्नीसोबत बंगळूरमध्ये स्थायिक झाला होता. राहुलने पोलिसांसमोर कबुली दिली आहे की, त्याने त्याच्या मुलीला कारमध्ये जवळ घेतले आणि तिच्यासोबत शेवटचे काही क्षण घालवले. तिच्यासोबत तो खेळला आणि नंतर तिला खाऊ घालण्यास पैसे नसल्यामुळे तिला मारुन टाकले. १५ नोव्हेंबर रोजी तो मुलीसह बेपत्ता झाला होता. त्यानंतर मुलाची आई भाव्या हिने पोलिस ठाण्यात दोघे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमार हा गेल्या ६ महिन्यांपासून बेरोजगार होता. त्यांचे बिटकॉईन व्यवसायात पैसे बुडाले होते. परमार याने त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार बंगळूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तो पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत चौकशी करत असे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात राहुलनेच घरातील दागिने चोरून गहाण ठेवल्याचे समोर आले होते. त्याने पोलिसांची दिशाभूल करत दागिने चोरीला गेल्याचा खोटी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्याला ताकीद देऊन पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले होते.

पोलिसात खोटी तक्रार दाखल केल्याने त्याचे परिणाम भोगावे लागतील या भीतीने त्याने हे कृत्य केले असावे, असा संशय आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Bengaluru Crime)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT