Latest

Belgaum Crime News : खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याच्या भीतीने मित्राचा खून; शीर आणले गावात

अविनाश सुतार

चिकोडी : पुढारी वृत्तसेवा : मित्राला दारू पाजून तीक्ष्ण हत्याराने त्याचा खून केला. त्यानंतर त्याचे शीर घेऊन गावात आल्याची धक्कादायक घटना रायबाग तालुक्यातील हारुगेरी शहराबाहेरील बडब्याकुड येथे गुरुवारी (दि.१७) रात्री घडली आहे. खासगी व्हिडिओ व्हायरल करण्यावरून बस्तवाड बाहेरील जंगलात मित्राचा खून करण्यात आला. अकबर जमादार (वय 21) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर महांतेश पुजार ( वय 23, रा.बडब्याकुड) असे आरोपीचे नाव आहे. (Belgaum Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत अकबर व आरोपी महांतेश हे दोघे जिवलग मित्र आहेत. आरोपी महांतेश याने एका तरुणीसोबतचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. आर्थिक वादातून त्याचा मोबाईल अकबर याने हिसकावून घेतला होता. हा सिक्रेट व्हिडिओ कुठेतरी व्हायरल करेल, या भीतीने अकबर याचा खून महांतेशने खून केला. (Belgaum Crime News)

घटनेची माहिती मिळताच शीर नसलेला मृतदेह हारुगेरी येथील सरकारी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केला होती. तर दुसरीकडे गावात शिर घेऊन आल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांनी दिल्यानंतर मध्यरात्री आरोपी महांतेश याला हारुगेरी पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी हारुगेरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

यापूर्वी मयत अकबर व आरोपी महांतेश हे दोघे जण चांगले मित्र होते. म्हैस चोरी करून विक्री करीत होते असे सांगितले जात आहे. या दोघांवर हारुगेरी पोलीस स्थानकात चोरीचा गुन्हा नोंद आहे.

बस्तवाड जंगल परिसरात खून झाला असून खून झालेल्या अकबर जमादार याच्या आईने फिर्याद दिली आहे. खून झालेल्या अकबर जमादार, आरोपी महांतेश पुजार हे दोघे मित्र असून दोघामध्ये आर्थिक व्यवहारातून वाद होता.

– एसपी डॉ. संजीव पाटील

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT