Latest

सिंधुदुर्गहून बेळगावला येणारा २५ बैलांचा कंटेनर जप्त, चंदगड पोलिसांची वेंगुर्ला- बेळगाव राज्यमार्गावर कारवाई

अमृता चौगुले

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चंदगड मार्गे बेळगाव येथे 25 बैलांना घेऊन येणारा कंटेनर बेळगाव – वेंगुर्ला मार्गावर पोलिसांनी जप्त केला. संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे. चालक व वाहक यांनी पलायन केले. पोलिसांनी कंटेनरसह 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व बैल बुधवारी सायंकाळी बेळगाव येथील विधानसौध जवळील कोळीकोप्प येथील श्री भगवान महावीर गोशाळेमध्ये सुपूर्द केले.

दरम्‍यान, लम्पीचा रोगाचा सर्वत्र प्रादुर्भाव आहे. त्‍यामुळे जनावरांची ने-आण करण्यास मनाई आहे. परंतु सिंधुदुर्गहून बेळगावला बेकायदा जनावरे विक्री करणाऱ्या टोळीकडून सातत्याने जनावरांची विक्री होत आहे. सिंधुदुर्गमध्ये निर्जनस्थळी,जंगलात जाऊन कंटेनरमध्ये जनावरे भरून पूर्णत: पॅक करून सदर कंटेनर मध्यरात्री चंदगड मार्गे बेळगावला रवाना केली जातात.

पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्‍यानंतर बेळगाव – वेंगुर्ला या राज्यमार्गावरील पाटणे फाटा या ठिकाणी कंटेनरची तपासणी केली असता सदर प्रकार उघडकीस आला. यानंतर घटनास्थळावरून चालक व वाहकाने पलायन केले. सदर कंटेनर पोलिसांनी जप्त केला आहे. बेकायदा वाहतूक करून जनावरे कत्तलखान्याकडे नेत असून कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही  वाचा 

SCROLL FOR NEXT