Latest

बेळगाव : दारू प्याले अन् बारमालकाला दिल्या लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा, तिघांना अटक

स्वालिया न. शिकलगार

अंकली (जि. बेळगाव) : पुढारी वृत्तसेवा : दारू पिऊन बारमालकाला लहान मुलांच्या खेळातील बनावट पाचशेच्या नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आलीय. या त्रिकुटाला घटप्रभा पोलिसांकडून अटक करण्यात आल्याची माहिती बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील यांनी दिली.

मुडालगी तालुक्यातील घटप्रभा शहरातील एका बारमध्ये मंगळवारी रात्री तिघांनी दारू पिऊन अंधारात बारमालकाला लहान मुलांच्या खेळातील पाचशे रुपयांच्या बनावट नोटा दिल्या. याची माहिती घटप्रभा पोलिसांना बार मॅनेजरने दिली होती. यावेळी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

रायचूर जिल्ह्यातील सिंधनूर येथील किरणकुमार रंगरेज कोप्पळ, कोरटगीर येथील रहिवासी सागर निरंजन व उडपी जिल्ह्यातील कोल्लूर तालुक्यातील रहिवाशी शशिधर भट्ट अशी तिघांना अटक केलेल्यांची नावे आहेत. अटक केलेल्यांकडून लहान मुलांच्या खेळातील पाचशे रूपयांच्या सुमारे ४७३ नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी घटप्रभा पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. पुढील तपास सुरू ठेवला आहे, असे जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT