Latest

बीडमधून निघून जा, नाहीतर….; करुणा मुंडे यांना फोनवरुन जीवे मारण्याच्या धमक्या

अविनाश सुतार

बीड; पुढारी वृत्तसेवा : मी धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे, तू राजकारण सोडून दे. बीडमधून निघून जा, नाहीतर तुला जाळून मारु, अशा धमकीचे फोन आपल्याला येत असल्याची तक्रार करुणा मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे आज (दि.२३) निवेदनाद्वारे केली. या प्रकरणात बालाजी डोईफोडे या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही मुंडे यांनी केली आहे.

शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे या काही दिवसांपासून बीड शहरात वास्तव्यास आहेत. यादरम्यान त्यांना सोशल मीडियातून तसेच फोनवरुन धमक्या दिल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना बालाजी डोईफोडे नावाच्या कार्यकर्त्याने फोन करुन तुला आणि तुझ्यासोबत काम करणार्‍यांना खोट्या केसमध्ये अडकवू, अशी धमकी दिल्याचे करुणा मुंडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, करुणा मुंडे यांचे पीए अजयकुमार देडे, त्यांची आई वनमाला देडे, कार्यकर्ता समाधान जरांगे यांच्यासह कुटुंबातील कोणाच्याही जीवाला काहीही धोका झाल्यास त्यास संपूर्णपणे राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे, राजश्री मुंडे, राज घनवट, तेजस ठक्कर, पुरुषोत्तम केंद्रे आणि बालाजी डोईफोडे हेच जबाबदार असतील, असेही निवेदनात म्हटले आहे. तसेच बालाजी डोईफोडे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करुणा मुंडे यांनी केली आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT