Latest

बीड : सोनपेठजवळ अपघातात एकाच कुटुंबातील २ ठार, ३ जण गंभीर

अविनाश सुतार

धारूर: पुढारी वृत्तसेवा : सोनपेठजवळ भरधाव गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडून गुरूवारी रात्री अपघात झाला. यात धारूर तालुक्यातील उमरेवाडी येथील वैद्यकीय शिक्षण घेणारा अशोक अर्जुन बचाटे (वय २३) व त्याची भावजय जयश्री सचिन बचाटे (वय २७) यांचे निधन झाले. या अपघातात बचाटे कुटुंबातील आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

भास्कर रामभाऊ बचाटे (वय ५२), दिनेश बालासाहेब बचाटे (वय २२), दादा भोसले (वय ५०), सचिन भास्कर बचाटे अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्या डोळ्याला व मणक्याला मार लागला आहे. परभणी येथील जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चालक अपघात ठिकाणाहून पसार झाला आहे. या घटनेमुळे उमरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, उमरेवाडी येथील बचाटे कुटुंबातील सचिन बचाटे यांचे दारूचे व्यसन सोडवण्यासाठी नांदेड येथे औषध आणण्यासाठी बचाटे कुटुंबीय गेले होते. नांदेडहून रात्री येत असताना सोनपेठ होऊन पुढे २० किलोमीटर अंतरावर भरधाव असलेली गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी होऊन पडली. गाडीमध्ये ६ ते ७ व्यक्ती होत्या. यातील लातूर येथे वैद्यकीय शिक्षणाची तयारी करणारा अशोक बचाटे व त्याची वहिनी जयश्री बचाटे यांचे अपघाती निधन झाले. तर आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT