पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मंत्र्यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्या प्रकरणी मालदीववर चौफेरे टीका सुरु आहे. आता भारतीयांनी मालदीव पर्यटनावर बहिष्कार टाकत भारतीय समुद्र पर्यटनाला अधिक पसंती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील समुद्रकिनारे सर्चिंग कित्येक पटीने वाढले आहे, अशी माहिती 'मेक माय ट्रिप'च्या प्रवक्त्याने दिली आहे. (Beach Destinations In India)
'मेक माय ट्रिप'च्या अहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर आणि मालदीव लक्षद्वीप तुलनेनंतर गेल्या २० वर्षाच्या तुलनेत भारतातील समुद्रकिनाऱ्यांचे सर्चिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लक्षद्वीपचे सर्च ३४०० टक्क्यांहून अधिक वाढले आहे. दमण ३५० टक्के तर अंदमानचा १२० टक्के इतका सर्च वाढला असल्याचे देखील मेक माय ट्रिपचे प्रवक्त्याने म्हटले आहे. (Beach Destinations In India)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला नुकतीच भेट दिली. यानंतर समुद्रकिनाऱ्यावर आनंद घेतलेले फोटो त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केले. मालदीवच्या काही मंत्री आणि राजकीय नेत्यांनी भारतीय पर्यटन आणि पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टिपण्णी केली. यानंतर भारतीय बिजनेसमन, बॉलीवूड सेलिब्रेटी आणि खेळाडूंनी लक्षद्वीप मुद्द्यावरून पीएम मोदींचे समर्थन केले. तसेच #boycott maldives म्हणत मालदीव मधील पर्यटनावर बहिष्कार टाकला आणि #ExploreIndianIslands म्हणत भारतातीय बेट पर्यटनाला प्रोत्साहन दिले. याचाच हा परिणाम आहे. (Beach Destinations In India)
मालदीव लक्षद्वीप तुलनेनंतर नेटीझन्सकडून भारतातील अनेक समुद्रकिनारे सर्चिग केले जात आहे. यामध्ये कोची, गोकर्ण, पुरी, विशाखापट्टणम, वर्कला, पुडुचेरी, गोवा आणि तमिळनाडू आणि केरळमधील इतर समुद्रकिनारे यांचा देखील समावेश आहे.