पुणे : पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी राज्यात सर्वच भागांत उष्णतेच्या लहरींनी कहर केला. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अन् उत्तर महाराष्ट्रात पारा 42 ते 44 अंशांवर गेला. दरम्यान, विदर्भात 12 मेपर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्व विदर्भ ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत वार्याची द्रोणीय रेषा तयार झाली आहे. त्यामुळे विदर्भात 12 मेपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, गेली दोन दिवस तेथेही पाऊस पडलेला नाही. राज्यात मंगळवारी कोरडेच वातावरण होते. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरी 42 ते 43 अंशांवर गेला होता. मंगळवारी सोलापूर, ब्रह्मपुरी 44, तर बीड, अकोला, वाशिम, वर्धा, अमरावती या शहरांचे तापमान 43 अंशांवर गेले.
सोलापूर 44.1, ब्रह्मपुरी 44.1, पुणे 39.6, कोल्हापूर 39.3, मुंबई 33.2, अहमदनगर 42, जळगाव 42.2, महाबळेश्वर 31.8, मालेगाव 42.6, नाशिक 36.8, सांगली 41.1, सातारा 40, धाराशिव 42.7, छ. संभाजीनगर 41.2, परभणी 42.6, नांदेड 42.6, बीड 43.2, अकोला 43.7, अमरावती 43.2, बुलढाणा 39.5, चंद्रपूर 43.6, गोंदिया 41.4, नागपूर 42.6, वाशिम 43.4, वर्धा 43.5 आणि यवतमाळ 42.