Latest

BCCI Women : भारतीय महिला संघ करणार बांगला देश दौरा

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : टीम इंडियाचा महिला संघ जुलैमध्ये बांगला देशचा दौरा करणार आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात भारतीय चाहत्यांसाठी क्रिकेटचा पाऊस असेल. या दौर्‍यात संघ तीन वन डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. (BCCI Women)

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू महिला प्रीमियर लीगनंतर विश्रांतीवर आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघ पुढील महिन्यात बांगला देशचा दौरा करणार आहे. बांगला देश क्रिकेट बोर्डाने 3 सामन्यांच्या वन डे आणि तितक्याच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी यजमानपदाचा निर्णय घेतला आहे. टी-20 मालिकेपासून या दौर्‍याला 9 जुलैपासून सुरुवात होणार आहे. आगामी मालिकेसाठी भारतीय संघ 6 जुलै रोजी ढाका येथे पोहोचेल. बांगला देश महिला क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शफीउल आलम चौधरी नदेल म्हणाले की, बांगला देश या मालिकेचे यजमानपद भूषवणार आहे. (BCCI Women)

जुलैमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची मर्यादित षटकांची मालिका शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवली जाईल. 11 वर्षांत पहिल्यांदाच शेर-ए-बांगला स्टेडियमवर महिला क्रिकेट संघाचा आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाईल. बांगला देशचा महिला संघ या मैदानावर शेवटचा सामना 2012 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT