Latest

Team India for World Cup : वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची यादी तयार? ‘या’ 3 खेळाडूंना डच्चू

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India for World Cup : अगामी वनडे वर्ल्डकपकडे सर्वाचे नजारा खिळल्या आहेत. 5 ऑक्टोबरपासून भारतात ही स्पर्धा सुरू होईल. दरम्यान, या स्पर्धेसाठी जवळपास सर्वच संघांनी जय्यत तयारी केली आहे. भारतानेही खेळाडूंची (Team India) यादी तयार केली असल्याचे समोर आले आहे. मात्र अद्याप त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. एका रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची (Team India) निवड केली आहे. संजू सॅमसनला (Sanju Samson) या स्पर्धेसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळालेले नसल्याचे समजते आहे.

सॅमसनसह प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्माला डच्चू (Team India for World Cup)

सध्या आशिया चषक स्पर्धा (Asia Cup) सुरू आहे. भारताचा 17 जणांचा संघ श्रीलंकेत असून संजू सॅमसन (Sanju Samson) हा स्टँडबाय खेळाडू म्हणून भारतीय संघासोबत आहे. एकप्रकारे तो 18 वा खेळाडू आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयने (BCCI) विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची निवड केली आहे. बोर्डाने विराट कोहली (Virat Kohli), शुभमन गिल (Shubman Gill), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यासह केएल राहुलला (KL Rahul) संघात स्थान दिले आहे. संजू सॅमसनला डावलण्यात आले असून इशान किशनला संधी देण्यात आली आहे. सॅमसनसोबतच प्रसिद्ध कृष्णा (Prasidha Krishna) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) यांनाही वगळण्यात आले आहे.

फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) पसंती

रिपोर्टनुसार, बीसीसीआयने टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्या (Hardik Pandya), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), अक्षर पटेल (Akshar Patel) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) या अष्टपैलूंना स्थान दिले आहे. तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद शमी (Shami) आणि मोहम्मद सिराज (Siraj) हे वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणाची धुरा सांभाळतील. तर फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) पसंती देण्यात आल्याची अशी माहिती पुढे येत आहे.

केएल राहुलच्या फिटनेसबाबत ग्रीन सिग्नल

बीसीसीआयला 5 सप्टेंबरपर्यंत वर्ल्डकपसाठी संघ जाहीर करायचा आहे. त्यानंतर खेळाडूंची यादी आयसीसीकडे सादर करावी लागणार आहे. केएल राहुलच्या फिटनेसची बोर्डाने विशेष काळजी घेतली आहे. रिपोर्टनुसार, वैद्यकीय पथकाने राहुलच्या फिटनेसबाबत ग्रीन सिग्नल दिला आहे. राहुल राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये खूप मेहनत घेत आहे. तो नेटमध्ये चांगला खेळत, असल्याचे वैद्यकीय पथकाने म्हटले आहे.

वर्ल्डकपसाठी भारताचा संभाव्य संघ : (Team India for World Cup)

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

SCROLL FOR NEXT