Latest

BCCI President Election : BCCI अध्यक्षपदाच्या रेसमध्ये आघाडीवर असणारे रॉजर बिन्नी कोण आहेत? जाणून घ्या…

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : रॉजर बिन्नी बीसीसीआयचे अध्यक्ष होण्याची शक्याता आहे. रॉजर बिन्नी हे १९८३ च्या विश्वचषक विजेता संघाचे सदस्य आहेत. १९८३ सालच्या विश्वचषकात रॉजर बिन्नी यांनी गोलंदाज म्हणून अप्रतिम कामगिरी केली होती. ६७ वर्षीय रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीनेही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. (BCCI President Election)

काही दिवसात भारतीय क्रिकेट नियमक मंडळाला (बीसीसीआय) नवा अध्यक्ष मिळणार आहे. रॉजर बिन्नी हे पुढील अध्यक्ष बनण्याची शक्यता आहे. कारण, बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी त्यांच्याव्यतिरिक्त कोणीही अर्ज भरलेला नाही. बिन्नी हे सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची जागा घेणार आहेत. दुसरीकडे अरुण धुमाळ यांच्या जागी भाजपचे आमदार आशिष शेलार यांना बीसीसीआयच्या खजिनदारपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तर जय शहा पूर्वीप्रमाणेच सचिवपदी कायम राहण्याची शक्यता आहे. (BCCI President Election)

रॉजर मायकेल हम्फ्रे बिन्नी यांना परिचयाची गरज नाही. रॉजर बिन्नी १९८३ चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होते. १९८३ साली विश्वचषकात रॉजर बिन्नी यांनी गोलंदाज म्हणून अप्रतिम कामगिरी केली होती. बिन्नी त्या विश्वचषकात सर्वाधिक १८ बळी घेणारे गोलंदाज होते. इतकी चांगली कामगिरी करूनही त्याची संघासारखी बाकी खेळाडूंसारखी चर्चा होत नाही.

१९८३च्या विश्वचषकात रॉजर बिन्नी यांनी सर्वच सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, मात्र ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध त्याने शानदार गोलंदाजी केली होती. त्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ६० षटकात २४७ धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु, भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रलियाचा संघ १२९ धावांत गारद झाला होता. बिन्नी यांनी ८ षटकात २९ धावा देत ४ बळी घेतले होते. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या ग्रॅहम वुड, ग्रॅहम येल्प, कर्णधार डेव्हिड हुक्स आणि टॉम होगन यांना बाद केले होते.

रॉजर बिन्नी यांचा आंतरराष्ट्रीय विक्रम

रॉजर बिन्नी हे भारताकडून खेळणारे पहिले अँग्लो-इंडियन क्रिकेटपटू आहेत. त्यांच्यानंतर रॉजर यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीनेही भारताचे प्रतिनिधित्व केले. रॉजर यांनी १९७९-८९ दरम्यान भारतीय संघाकडून २७ कसोटी आणि ७२ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले. १९७९ साली पाकिस्तान विरुद्ध बंगळुरू कसोटीतून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

रॉजर बिन्नी यांनी कसोटी कारकिर्दीत ३.६३ च्या सरासरीने ४७ विकेट घेतल्या. त्याचबरोबर त्यांच्या नावावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९.३५ च्या सरासरीने ७७ बळी घेतले आहेत. रॉजर बिन्नी हे उत्तम फलंदाजीही करत होते. त्यांच्या नावावर कसोटीत ८३० आणि एकदिवसीय सामन्यात ६२९ धावा आहेत.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रॉजर बिन्नी यांनी प्रशिक्षकपदाची कारकिर्द सुरू केली. मोहम्मद कैफ आणि युवराज सिंगसारखे खेळाडू असलेल्या भारतीय संघाने २००० साली अंडर-१९ विश्वचषक जिंकला होता. तेव्हा रॉजर बिन्नी त्या संघाचे प्रशिक्षक होते.

रॉजर हे देखील वादात सापडला होते. २०१४ साली त्यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीची टीम इंडियामध्ये निवड झाली होती. तेव्हा बिन्नी निवडक समितीचे सदस्य होते. स्टुअर्ट बिन्नीच्या निवडीनंतर बराच गदारोळ झाला होता. स्टुअर्टची निवड त्याच्या वडिलांमुळे झाल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. मात्र, यावर स्पष्टीकरण देताना रॉजर यांनी मोठा खुलासा केला होता. जेव्हा माझ्या मुलाचे नाव निवडीसाठी आले तेव्हा मी मीटिंग सोडून बाहेर गेलो होतो. असे त्यांनी सांगितले होते.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT