Latest

BCCI Selection Committee : बीसीसीआयच्या नवीन निवड समितीची घोषणा!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : BCCI Selection Committee : बंगालची माजी क्रिकेटपटू आणि निवडकर्ता श्यामा डी शॉ यांचा अखिल भारतीय वरिष्ठ महिला निवड समितीच्या सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी ही माहिती दिली. याशिवाय व्हीएस टिळक नायडू यांची कनिष्ठ निवड समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 'सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा ​​आणि जतीन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) महिला निवड समिती आणि ज्युनियर क्रिकेट समितीमधील प्रत्येकी एका निवडकर्त्याच्या पदांसाठीच्या अर्जांची छाननी केली. तपासणीनंतर सीएसीने एकमताने श्यामा डी शॉ आणि व्ही.एस. टिळक नायडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.' (BCCI Selection Committee)

डावखु-या फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज शॉ यांनी 3 कसोटी आणि 5 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे तर 1985 ते 1997 पर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व केले. नंतर 1998 ते 2002 पर्यंत त्या रेल्वेकडून खेळल्या. निवृत्तीनंतर शॉ यांनी बंगालच्या सिलेक्टर म्हणूनही काम पाहिले.

व्हीएस टिळक नायडू यांनी 1998-99 ते 2009-10 दरम्यान कर्नाटक तसेच दुलीप ट्रॉफी आणि देवधर ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जात होत्या. त्यांनी 93 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4386 धावा फटकावल्या आहेत. 2013 ते 2016 या काळात त्यांनी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) कनिष्ठ निवड समितीचे अध्यक्षपद भूषवलं आहे. 2015-16 हंगामात त्यांनी केएससीएच्या वरिष्ठ निवड समितीमध्ये देखील काम केले आहे. (BCCI Selection Committee)

दरम्यान, महिला भारतीय संघ डिसेंबरमध्ये इंग्लंडला रवाना होणार आहे. वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियासोबत एक कसोटी, 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. जी पुढील वर्षी जानेवारीपर्यंत चालणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT