पुढारी ऑनलाईन डेस्क : आजवर लग्नाच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. लव्ह मॅरेज ( प्रेम विवाह) मधील संघर्ष ते नियोजित विवाहातील अनेक मान-अपमान आणि गोंधळाचे किस्से तुम्ही ऐकले असतील. मात्र बरेली येथे एका लव्ह मॅरेजवेळी अजब प्रकार घडला. या एका फिल्मी स्टाईल हाय-व्होल्टेज ड्रामानंतर पार पडलेल्या विवाहाची चर्चा उत्तर प्रदेशमध्ये रंगली आहे. ( Bareilly Love Marriage)
एका तरुणीचे बदाऊन जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पुरुषासोबत मागील अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबीयांनी समंती दिल्यानंतर लग्नाची तारीख ठरली. रविवार दि. २१ मे रोजी भूतेश्वर नाथ मंदिरात दोघांचा विवाह होईल असे निश्चित झाले. ( Bareilly Love Marriage )
लग्नाच्या दिवशी वऱ्हाडी मंडपात आलेच नाही. वधूने नियोजित वराला फोन केला. आईला घेण्यासाठी बुदाऊनला जात
असल्याचे कारण त्याने सांगितले. तिला त्याचा संशय आला. तिने बरेलीपासून सुमारे 20 किमीमीटर पाठलाग करत भीमोरा पोलीस स्टेशनजवळ बसमधून पलायनाच्या तयारीत असलेल्या नियोजित वराला पकडले. येथे दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. बघ्यांना हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
अखेर दाेघांमधील वादावर पडदा पडला. वराने विवाहाची शपथ घेतली. वधू वराल घेवून मांडवात आली. दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह सोहळा पार पडला. वधूने २० किलाेमीटर पाठलाग करुन वराला ओढत मांडवात आणून बोहल्यावर उभे केलेल्या प्रकाराची उत्तर प्रदेशमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
हेही वाचा :