पुढारी ऑनलाईन डेस्क : ख्रिस्तोफर नोलनचा प्रतीक्षित चित्रपट 'ओपेनहायमर' आणि ग्रेटा गेरविगचा 'बार्बी' बहुचर्चित चित्रपट आमने-सामने असणार आहेत. (Oppenheimer vs Barbie ) या शुक्रवारी २१ जुलै रोजी भारतीय चित्रपटगृहात दोन्ही चित्रपट दाखल होणार आहेत. दोन्ही चित्रपटांविषयी जगभरात चर्चा सुरू आहे. दोन्ही चित्रपटांची ॲडव्हान्स बुकींग सुरू झाली आहे. (Oppenheimer vs Barbie )
चित्रपट ट्रेड एनालिस्ट हिमेश मांकड यांच्या माहितीनुसार, पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिसमध्ये जवळपास १ लाखांहून अधिक तिकिट बूक झाले आहेत. ज्यामध्ये आयमॅक्समध्ये स्क्रीनिंगदेखील समाविष्ट आहे.
मांकड म्हणाले, की, चित्रपटाने आपल्या सुरुवातीच्या दिवसात अनेक सीरीजमध्ये १६ हजार तिकिट विक्रि करण्यात यश मिळवलंय.
ग्रेटा गेरविग-मार्गोट रोबी, आगामी 'बार्बी'च्या कलाकारांनी एका चित्रपटगृहात चित्रपटाच्या पोस्टरच्या समोर तिकिट सोबत पोझ देऊन क्रिस्टोफर नोलनच्या 'ओपेनहायमर'साठी आपले समर्थन दर्शवले. 'ओपेनहायमर'मध्ये मुख्य भूमिका साकारणारी सिलियन मर्फीने 'बार्बी'साठी उत्साह व्यक्त केला. सोबतच हॉलीवूडच्या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांनी दोन चित्रपट एकत्र रिलीजसाठी कौतुक केलं.