Latest

बारामती : महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या पती-पत्नीवर गुन्हा दाखल

backup backup

बारामती; पुढारी वृत्तसेवा : एका दाम्पत्याने आपल्याकडे कामाला येत नसल्याच्या रागातून महिलेची अश्लिल छायाचित्रे तिच्या पतीसह नातेवाईकांना पाठवल्याची घटना घडली. संबंधीत महिलेची बदनामी केल्याप्रकरणी पती-पत्नीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवीलाल पेमाराम कुमावत व पायल देविलाल कुमावत अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी २४ वर्षीय मजूर महिलेने फिर्याद दिली. जून २०२१ पासून ती व तिचा पती देवीलाल यांच्याकडे बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. तिचा पती फरशी बसविण्याचे काम करत होता. दरम्यानच्या काळात देवीलाल याच्याशी तिचे सूत जुळले. ती त्याच्याशी चॅटींग करू लागली. अनेकदा त्यांच्यात व्हिडीओ कॅाल होवू लागले. व्हिडीओ कॅालवेळी देवीलाल याने तिचे नको त्या अवस्थेतील फोटोंचे स्क्रीन शॅाट काढून घेतले. चार महिने त्यांच्यात हा प्रकार सुरु होता. दरम्यान महिलेने त्याच्याकडे कामाला जाणे बंद केले.

यावर देवीलाल व त्याच्या पत्नीने तुम्ही आमच्याकडेच कामाला यायचे असे म्हणत तिला धमकी दिली. महिलेने नकार दिल्यावर या दोघांनी तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तरीही ती त्याच्याकडे कामाला गेली नाही. त्या रागातून या दोघांनी तिच्या पतीसह अन्य नातेवाईकांच्या व्हाटसअपवर हे फोटो पाठवत तिची बदनामी केली. या दोघांविरोधात पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा कलमानुसार गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT