Latest

दर शनिवारी बँका बंद राहणार; रोजच्या कामाची वेळ वाढणार

मोहन कारंडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : बँक कर्मचारी संघटनांनी केलेली पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी मान्य करण्याची तयारी इंडियन बँक्स असोसिएशनने (आयबीए) दर्शविली आहे. त्यामुळे आता दर शनिवारी-रविवारी बँकांचे दरवाजे बंद राहतील.

डिजिटल युगात बँकांशी संबंधित बहुसंख्य कामे ऑनलाईन करता येतात. तरीही बँकेत प्रत्यक्ष जाऊन आपली कामे करणार्‍या ग्राहकांना आता वीकेंडला बँकेत जाता येणार नाही. बँक अधिकारी व कर्मचारी संघटनांनी 'आयबीए'ला दिलेला प्रस्ताव तत्त्वत: मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा केला जाणार आहे. सध्या पहिल्या आणि तिसर्‍या शनिवारी बँकांचे कामकाज होते. दुसर्‍या व चौथ्या शनिवारच्या सुट्टीची मात्र लोकांना सवय झाली आहे. आता महिन्यातील उरलेल्या दोन शनिवारीदेखील बँकांना टाळे दिसेल.

पाच दिवसांच्या आठवड्याबाबत 'आयबीए'ने युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉईजच्या प्रतिनिधींशी यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर सर्व शनिवारी बँकांचे कामकाज बंद ठेवण्याची मागणी मान्य करण्यात आली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT