Latest

BAN vs PAK : बांगलादेशचे पाकिस्तानला 205 धावांचे आव्हान

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरूवातीपासून पाकिस्तानच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत होते.अखेरीस मोहम्मद वसीम ज्युनियरने 46 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मुस्तफिजुर रहमानला क्लीन बोल्ड करत बांगलादेशच्या डाव 204 धावांवर रोखला. बांगलादेशसाठी महमुदुल्लाहने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. तर लिटन दासने 45 धावांचे योगदान दिले कर्णधार शकीब अल हसन 43 आणि मेहदी हसन मिराज 25 धावा करून बाद झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियर आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी तीन बळी घेतले. तर हरिस रौफला दोन विकेट घेतल्या. इफ्तिखार अहमद आणि उसामा मीर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दोन्ही संघात बदल

बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शाकिबने संघात एक बदल केला आहे. मेहदी हसनच्या जागी तौहीदला संधी दिली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने तीन बदल केले आहेत. इमाम उल हक, शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांच्या बदली फखर जमान, उसामा मीर आणि आगा सलमानला संघात स्थान देण्यात आले आहे.

पाकिस्तानसाठी करा किंवा मरा

वर्ल्डकप स्पर्धेत आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पाकिस्तानला उर्वरित तिन्ही सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. यापैकी एका सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्यास पाकिस्तानचे टॉप फोरमध्ये येण्याचे मार्ग बंद होतील.

संघ :

बांगलादेश : लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, तौहिद हृदोय, मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.

पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT