Latest

बीड : बजरंग सोनवणे यांचा अजित पवार गटाला धक्‍का; पक्षाच्या सदस्‍यत्‍वाचा राजीनामा

निलेश पोतदार

बीड ; पुढारी वृत्तसेवा बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वचाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सादर केला असून, आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बजरंग सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश निश्चित झाल्याचे दिसत आहे.

आज दुपारी ते शरद पवार यांची देखील भेट घेणार असून, यावेळी हा प्रवेश होईल असे मानले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून ज्योती मेटे की बजरंग सोनवणे हा प्रश्न सध्या तरी कायम आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT