Latest

ayushmann khurrana : एकेकाळी रेल्वेत गाणी म्हणत पैसे कमवाणारा आयुषमान कोट्यधीश कसा बनला?

backup backup

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : बॉलिवुडमध्ये सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर केलेल्या आयुष्यमान खुराना याचा आज बर्थडे आहे. १४ सप्टेंबर १८४ साली चंदीगढ येथे आयुषमान खुरानाचा जन्म झाला. आपल्या करियची सुरूवात त्याने रेडिओ आणि टिव्हीशोच्या माध्यामातून केली होती. दरम्यान आयुषमान बॉलिवुड चित्रपटाच्या माध्यमातून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. (ayushmann khurrana used sing songs in train due to lack of money how he got break in bollywood)

पैशासाठी रेल्वेत गाणी म्हणायचा

आयुषमान खुरानाने (ayushmann khurrana) आपल्या करियरसाठी मोठे कष्ट घेतले.

त्याच्या कॉलेज जीवनात त्याला ट्रिपला जाण्यासाठी पैशाची गरज होती. यावेळी त्याने पैशासाठी रेल्वेमध्ये गाणे गात पैसे कमवले होते.

यानंतर तो कित्येक वेळा पैशासाठी रेल्वेमध्ये गाणी गात राहिला यातुनच त्याने आपला सगळा खर्च भागवत असे.

एँकर, सिंगर आणि अभिनेता म्हणून आयुष्यमान खुरानाने वयाच्या १७ व्या वर्षी पहिले पाऊल टाकले.

चॅनल व्हीच्या कार्यक्रमात 'पॉपस्टार' मध्ये भाग घेणारा तो सर्वात तरुण स्पर्धक होता.

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी आयुष्मान खुराना रेडिओमध्ये आरजे म्हणून काम करायचा.

बिग एफएमवर त्याचा 'मान ना मान, मैं तेरा आयुष्मान' हा शो सुपरहिट झाला.

आयुषमान खुराना एमटीव्हीचा लोकप्रिय कार्यक्रम रोडीज जिंकल्यानंतर प्रसिद्धीझोतात आला.

यानंतर आयुषमानने एमटीव्हीसाठी व्हीजे म्हणून अनेक कार्यक्रम केले.

दिग्दर्शक शुजित सरकार यांनी आयुषमानला चित्रपट विश्वात पहिला संधी दिला.

२०१२ पासून सिनेसृष्टीत पदार्पण

२०१२ मध्ये आयुषमानने शुजितच्या सुपरहिट चित्रपट 'विकी डोनर' द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

आयुषमानला या चित्रपटासाठी अनेक पुरस्कार मिळाले.

'विकी डोनर' नंतर आयुष्मानची गाडी सुसाट निघाली. यानंतर त्याने 'नौटंकीसाला', 'बेवकोफियाँ', 'हवाईजादा' हे चित्रपट केले. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुर्णपणे फसले.

दरम्यान आयुषमानचा 'दम लगाके हैशा' हा चित्रपट २०१५ मध्ये रिलीज झाला.

या चित्रपटानंतर आयुषमानच्या कारकिर्दीला पुन्हा वेग आला आणि तो एकामागून एक हिट चित्रपट देऊन मोठ्या पडद्यावर चर्चेत राहिला.

हेही वाचलं का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT