Latest

Ayushmann : ‘मन्नत’कडे पाहणाऱ्या नजरा अचानक आयुष्मानकडे वळल्या अन्‌ 

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानचे घर मन्नत बाहेर गर्दीत उभारलेल्या आयुष्मानला पाहून सर्वचं आश्चर्यचकित झाले (Ayushmann) आणि मन्नतकडे पाहणाऱ्यांच्या नजरा आयु्मनकडे वळल्या. मुंबईमध्ये गेल्यानंतर अनेकजण शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान खान यासारख्या सेलिब्रिटींचे घर पाहायला जातात. त्यांच्यासाठी हे स्वप्नवत असते. लोक स्टार्सच्या घराबाहेर जाऊन सेल्फी, फोट काढतात. एखाद्या बॉलिवूड सेलिब्रिटी एखाद्या स्टारच्या घराबाहेर उभा असल्याचं तुम्ही कधी ऐकलं वा पाहिलं नसेल. पण यावेळी वेगळं घडलं आहे. अभिनेता आयुष्मान खुराना खुद्द शाहरुख खानचे घर 'मन्नत' बाहेर फॅन्सच्या गर्दीत उभा असलेला दिसला. (Ayushmann)

मग काय? आयुष्मान खुरानाने आपला हा फोटो स्वत: सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये तो गर्दीच्या मध्ये उभा असलेला दिसतो आहे. पण, त्याची नजर 'मन्नत'वर आहे. सर्वांच्या नजरा, सर्वांचे कॅमेरे मन्नतला सोडून आयु्ष्मान खुरानाला पाहू लागले.

आयुष्मान खुरानाने या प्रसंगाचा एक फोटो शेअर करत लिहिले आहे, 'मन्नत से गुजर रहा था तो एक मन्नत मांग ली.' यासोबत त्याने #AnActionHero #2ndDecember #SRKian असे हॅशटॅग्ज लिहिले आहेत. आयुष्मान खुरानाच्या या पोस्टवर इंडस्ट्रीतील स्टार, फ्रेंड्स खूप सारे मजेशीर कमेंट्स करत आहेत.

झारा खानने लिहिले आहे की, 'वरील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत.' जितेंद्र कुमार म्हणाले – मुंबईचे आवडते ठिकाण.
मात्र, आयुष्मान खुरानाच्या या पोस्टवर काही सोशल मीडिया यूजर्सचे मत वेगळे आहे.

एकाने लिहिले आहे – बायकॉट होणाऱ्या लोकांकडून नवस काय मागायचे. स्वत:ला कमी लेखू नका, तुम्हीही त्या दर्जाचे अभिनेता आहात, खरे तर त्यांच्यापेक्षा चांगले, तुम्ही गाता. एक चाहता म्हणाला- भाऊ, तुम्ही शाहरुख खानच्या घरी आलात आणि त्याची जागा घेतली. आयुष्मान खुरानाचा 'अ‍ॅन ॲक्शन हिरो' हा चित्रपट २ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT