Latest

नंदुरबार : प्रभाग रचनेच्या कामात टाळाटाळ; शाखा अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल

backup backup

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा

ग्रामपंचायत प्रभाग रचनेचे दिलेले कामकाज करण्यास टाळाटाळ करत, आदेशाचे उल्लंघन करणे शाखा अभियंत्याला चांगलेच महागात पडले. याप्रकरणी सदर अभियंत्याविरुद्ध थेट नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार तालुका पंचायत समिती येथे कार्यरत असलेले शाखा अभियंता ई.जी. भामरे यांना दि. ६ ते १३ डिसेंबर पर्यंत श्रीरामपुर व सुतारे गावच्या ग्रामपंचायत प्रभाग रचनेचे कामकाज सोपवण्यात आले होते. तथापि ते काम वेळेत पूर्ण करण्यात आले नाही.

याची दखल घेत नायब तहसीलदार भीमराव बोरसे यांनी नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यात म्हंटले आहे की, शाखा अभियंता भामरे हे शासकिय कर्मचारी असून त्यांना श्रीरामपुर व सुतारे गावाचे ग्रामपंचायतीचे प्रभाग रचना दिलेले कामकाज करण्याचे काम दिले असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

तसेच काम करण्यास टाळाटाळ करुन महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोग यांच्या आदेशाचे व जिल्हाधिकारी तसेच तहसिलदार यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. म्हणून लोक प्रतिनिधी अधि. १९५० प्रमाणे कलम १३४ (१) निवडणुक ४८१/२०२१ अनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. पोसई सोनवणे हे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT