मुंबई; पुढारी ऑनलाईन : सध्या भारतीय सिनेसृष्टीवर साऊथ आणि हॉलिवूडचे चित्रपट राज्य करत आहेत असेच म्हणावे लागेल. २०२२ चे वर्षे आता संपले आहे आणि आपण २०२३ मध्ये प्रवेश करत आहोत. सरत्या वर्षात सिनेसृष्टीवर साऊथचाच दबदबा पहायला मिळाला. एखाद्या बॉलिवूडच्या चित्रपटाने घवघवीत यश मिळवले असे पटकण सांगणे सुद्धा कठीण झाले आहे. त्यात आता वर्षाच्या शेवटच्या दोन आठवड्यात हॉलिवूडची अवतार चित्रपटाने प्रेक्षकांना मोहित करुन सोडले आहे. १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दोन आठवड्यात तब्बल २८७ कोटींची बंपर कमाई केले आहे. त्यामुळे हॉलिवूडचा दबदबा भारतीय सिनेप्रेक्षकांवर पुर्वीप्रमाणेच असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. (Avatar Bampper Collection)
२०२२ सालात पुष्पा, आरआरआर आणि विक्रम या साऊथच्या चित्रपटांनी अक्षरश: वेड लावले होते. त्यामुळे पुन्हा एकदा साऊथचा दबदबा सिद्ध झाला. बॉलिवूड विषयी बोलायचे झाले तर ब्रह्मास्त्रने चांगली कमाई केले तसेच कश्मीर फाइल्स, गंगुबाई काठियावाडी, विक्रम वेधा आणि शेवटच्या महिन्यात दृश्यम २ सारख्या चित्रपटांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पण, या चित्रपटांना साऊथच्या चित्रपटांची बरोबरी करता आली नाही. (Avatar Bampper Collection)
हॉलिवूच्या बहुचर्चित अवतारच्या या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेल 'अवतार : द वे ऑफ वॉटर' या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे कमाई केली आहे. या साय-फाय फिल्मने अवघ्या भारताला चित्रपट गृहात येण्यास भाग पाडले. दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांच्या या चित्रपटाने रेकॉर्ड कमाईचा सिलसिला कायम ठेवला आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १८७ कोटींची कमाई केली. पण, दुसऱ्या आवड्यात काहिसा पाठिमागे पडला तरीही त्याने ९८ कोटींची कमाई केली. दोन आठवड्यात या चित्रपटाने तब्बल २८७ कोटींची कमाई केली. आता तो पुढील म्हणजे ३ आठवड्यात ३०० कोटींचा टप्पा पार करेल. (Avatar Bampper Collection)
या सर्व कमाईमध्ये चित्रपटाने साऊथमध्ये चांगला गल्ला मिळवला आहे. केवळ साऊथमध्ये १०० कोटीहून अधिकचा गल्ला अवतार मिळवला आहे. तसेच रणवीरसिंहचा सर्कस सिनेमा पडल्यामुळे त्याचा फायदा अवतारला मिळला. तसेच ख्रिसमसच्या हॉलिडेचा फायदा सुद्धा या चित्रपटा मिळाला. आता नव्या वर्षात जेथे एक सुद्धा सार्वजनिक सुट्टी नसरणार आहे, तेव्हा हा चित्रपट किती गल्ला मिळवतो हे पाहणे उत्सकतेचे ठरेल.
अधिक वाचा :