Latest

IND vs AUS : भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर, मॅक्सवेलसह तीन खेळाडूंचे पुनरागमन

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. 16 सदस्यीय संघात अनेक दिग्गज खेळाडू परतले आहेत. या मालिकेत फिरकी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलही पुनरागमन करणार आहे. तो पायाच्या दुखापतीशी झुंज देत होता. घोट्याच्या दुखापतीने त्रस्त मिचेल मार्शही संघात परतला आहे. या दोघांशिवाय झ्ये रिचर्डसनचेही संघात पुनरागमन झाले आहे. दरम्यान पॅट कमिन्सकडे वनडे संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना १७ मार्च रोजी मुंबईत, दुसरा सामना १९ मार्च रोजी विझाग येथे आणि तिसरा एकदिवसीय सामना २२ मार्च रोजी चेन्नई येथे होणार आहे. या मालिकेत डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबुशेनसारखे स्टार फलंदाजही कांगारू संघाचा भाग असणार आहेत. मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली म्हणाले की, "या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी या मालिकेमुळे ऑस्ट्रेलियाला चांगला सराव सत्र मिळेल. विश्वचषक फक्त सात महिन्यांवर आहे आणि भारतातील हे सामने आमच्या तयारीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. ग्लेन, मिशेल आणि झ्ये हे सर्व प्रमुख खेळाडू आहेत जे ऑक्टोबरमध्ये संघाचा भाग असतील."

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झ्ये रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT