Latest

AUS vs ZIM : झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा ऐतिहासिक विजय, ऑस्‍ट्रेलियाला घरच्या मैदानात हरवले!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : झिम्बाब्वे आणि ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यात सुरु असणार्‍या वन डे मालिकेतील तिसरा सामना झिम्‍बाब्‍वेने जिंकला. या संघाने प्रथमच ऑस्‍ट्रेलियाला त्‍यांच्‍या मैदानावर हरवत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. ( AUS vs ZIM )ऑस्‍ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना १४१ धावा केल्‍या. झिम्‍बाब्‍वेने सात विकेट गमावत हे लक्ष्‍य साध्‍य केले. पाच विकेट घेणारा झिम्बाब्वेचा गोलंदाज रेयान बर्ल हा सामनावीर ठरला.

झिम्बाब्वे आणि ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यात आतापर्यंत ३३ वन डे सामने झाले. यातील तीनच सामने झिम्‍बाब्‍वेने जिंकले आहेत. प्रथमच या संघाने ऑस्‍ट्रेलियाला त्‍यांच्‍याच मैदानावर हरविण्‍याचा पराक्रम केला आहे. या दोन संघांमध्‍ये पहिला वन डे सामना इंग्‍लंडमध्‍ये १९८३ मध्‍ये झाला होता. विशेष म्‍हणजे हा सामना झिम्‍बाब्‍वेने १२ धावांनी जिंकला होता. २०१४ मध्‍ये हरारेमध्‍ये पुन्‍हा एकदा ऑस्‍ट्रेलियाचा पराभव केला होता. आता प्रथमच ऑस्‍ट्रेलियाच्या संघास त्‍यांच्‍याच मैदानावर हरवत ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

AUS vs ZIM: रेयान बर्लचा भेदक मारा

तिसर्‍या वन डे सामन्‍यात झिम्‍बाब्‍वेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रेयान बर्ल याच्‍या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्‍ट्रेलियाच्‍या फलंदाजांनी नांगी टाकली. रेयाने याने केवळ तीन षटकांमध्‍ये १० धावा देत पाच विकेट घेतल्‍या. ऑस्‍ट्रेलियाचा सलामीवीर डेव्‍हिड वॉर्नर याने ९४ धावा केल्‍या. यामध्‍ये त्‍याने १४ चौकार तर २ षटकार लगावले. मॅक्‍सवेल याने १९ धावा केल्‍या. केवळ हे दोन फलंदाज धावांचा  दुहेरी आकडा पार करु शकले. ऑस्‍ट्रेलियाचा संपूर्ण संघ १४४ धावांत तंबूत परतला.

कर्णधार रेजिसच्‍या खेळीने झिम्बाब्वेचा स्‍मरणीय विजय

झिम्बाब्वेचे सलामीवीर कायटानो आणि मरुमानी यांनी  चांगली सुरुवात केली. पहिल्‍या विकेटसाठी त्‍यांनी ३८ धावा केल्‍या. कायटानो १९ धावांवर बाद झाला. यानंतर ऑस्‍ट्रेलियाने सलग पाच विकेट घेतल्‍या.  ७७ धावांवर झिम्‍बाब्‍वे पाच विकेट गमावल्या. तेव्‍हा ऑस्‍ट्रेलियाचा विजय निश्‍चित मानला जात होता. मात्र सहाव्‍या विकेटसाठी कर्णधार रेजिस चकाबवा आणि टोनी मनुयोंगा यांनी ३९ धावांची निर्णायक खेळी केल्याने संघाने १०० धावांचा टप्‍पा पूर्ण केला. टोनी १७ धावा करुन बाद झाल्‍यानंतर. कर्णधार रेजिस याने रेयान बर्ल यांच्‍या सहयाने सातव्‍या विकेटसाठी २२ धावांची भागीदारी केली. बर्ल ११ धावांवर बाद झाला. यानंतर रेजिस याने ब्रँड इवांसच्‍या मदतीने ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली. कर्णधार रेजिस याने अखेरपर्यंत चिवट फलंदाजी करत हा विजय सुकर केला. त्‍याने ३७ धावांची खेळी केली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT