औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचा इशारा मनसेच्या नेत्यांनी दिली हाेेता. त्यामुळे परिसरात मोठा पाेलीस बंदोबस्त तैनात केला होता. येथे अप्रिय घटना घडू नये, म्हणून शुक्रवारपासून (दि.१८) पाच दिवस कबर बंद ठेवण्याचा निर्णय पुरातत्त्व विभागाने घेतला आहे.
एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी दौलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्यापासून वादाला सुरूवात झाली. याबाबत मनसेने आंदोलन छेडले होते. त्यातच मनसेच्या नेत्यांनी कबर उखडून टाकण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार पाेलिस बंदोबस्त तैनात केला असून दि. १८ ते २२ दरम्यान कबर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचलंत का ?