Latest

गुजरातमध्ये मोठी कारवाई; ९ जणांसह पाकिस्तानी बोट पकडली, २८० कोटींचे हेरॉईन जप्त

दीपक दि. भांदिगरे

गांधीनगर (गुजरात) : पुढारी ऑनलाईन

भारतीय तटरक्षक दल आणि एटीएस गुजरात यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पाकिस्तानी बोट आणि त्यावरील ९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत सुमारे २८० कोटी किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई अरबी समुद्रातील भारतीय हद्दीत करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या बोटीचे नाव 'अल हज' आहे. ही बोट पुढील तपासासाठी जखाऊ येथे आणली जात असल्याचे भारतीय तटरक्षक दलाने म्हटले आहे.

भारतीय तटरक्षक दल आणि एटीएस गुजरात यांनी केलेली ही कारवाई मोठी आहे. जी बोट जप्त करण्यात आली आहे त्यातून हेरॉईन नेले जात होते. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. जखाऊ हे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील कच्छ खाडीवरील एक बंदर आहे. जखाऊ गावापासून हे बंदर ८ किलोमीटर अंतरावर आहे.

नुकत्याच कच्छमधील कांडला बंदराजवळ केलेल्या एका संयुक्त कारवाईत १,३०० कोटी रुपयांचे २६० किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. तर गेल्या वर्षी गुजरातमधील दहशतवाद विरोधी पथकाने ( Gujarat ATS ) धडक कारवाई करत तब्‍बल १२० किलो हेरॉईन जप्‍त केले होते. मोरबी जिल्‍ह्यात जप्‍त करण्‍यात आलेल्‍या या ड्रग्‍जची आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेतील किंमत ६०० कोटी रुपये होती.

SCROLL FOR NEXT