Latest

Atrocities Uyghur Muslims In China : चीनमध्ये कुराण बाळगण्यावरूनही मुस्लिम ठरताहेत दहशतवादी

अमृता चौगुले

बीजिंग; वृत्तसंस्था : चीनमधील उईघर मुस्लिमांची (Uyghur Muslims) स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चालली आहे. या देशातील शिनजियांग प्रांतात मुस्लिम बहुसंख्य आहेत. कुराण जवळ बाळगले किंवा एखादा इस्लामशी संबंधित फोटो वा व्हिडीओ मोबाईलमध्ये स्टोअर असेल तरीही त्याबद्दल मुस्लिमांना दहशतवाद्याचा शिक्का मारला जात आहे. मुस्लिमांच्या मोबाईल फोनवर पाळत ठेवण्यासाठी चीनने स्वतंत्र यंत्रणाच उभी केली आहे. ह्युमन राईटस् वॉचच्या अगदी अलीकडच्या अहवालानुसार चिनी पोलिस मुस्लिामांकडील धार्मिक प्रतीके असलेल्या कुठल्याही वस्तूंचा संबंध थेट दहशतवादाशी जोडत आहेत. इस्लामिक गाण्यांनाही दहशतवादाचे प्रचार साहित्य ठरवले जात आहे. (Atrocities Uyghur Muslims In China)

उईघरांवरील अत्याचाराची मालिका (Atrocities Uyghur Muslims In China)

  • उईघरांना ओलिस ठेवले जाते.
  • नको ते वैद्यकीय उपचार केले जातात.
  • अवयव काढून काळ्या बाजारात विकले जातात.
  • मुस्लिम महिलांवर लैंगिक अत्याचार होत आहेत.
  • मुस्लिम पुरुषांची सक्तीने नसबंदी
  • युवकांकडून सक्तीने वेठबिगारी
  • चिनी तरुणांची उईघर मुस्लिम मुलींशी जबरदस्ती लग्ने

मुस्लिमांच्या जन्मासाठी गर्भाशयेच शिल्लक न ठेवण्याची भयंकर चिनी योजना!

  • चीनमधील हान समुदायातील तरुणांनी मुस्लिम तरुणींशी लग्ने करावीत म्हणून त्यांना विशेष भत्ता (जवळपास 4 लाख रुपये) दिला जातो. मोफत निवास, वैद्यकीय सुविधा आणि इतर अतिरिक्त भत्ते वेगळे.
  • वॉशिंग्टनमधील उईघर मानवाधिकार प्रकल्प या संस्थेच्या माहितीनुसार एखाद्या मुस्लिम मुलीने हान तरुणाशी लग्नास नकार दिला तर तिच्या आई-बाबांना तुरुंगात टाकले जाते.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT