Latest

सौरभ भारद्वाज, अतिशी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

नंदू लटके

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा – दिल्लीच्या केजरीवाल मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून आप नेते सौरभ भारद्वाज तसेच अतिशी यांनी आज ( दि. ९ )  शपथ घेतली. भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी भारद्वाज व अतिशी यांना मंत्रीपदाची संधी दिलेली आहे.

सौरभ भारद्वाज यांच्याकडे आरोग्य, पाणीपुरवठा, उद्योग, नगरविकास ही खाती देण्यात आली आहेत. दुसरीकडे अतिशी यांच्याकडे शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा आणि पर्यटन ही खाती देण्यात आली आहेत. या दोघांच्या शपथविधी कार्यक्रमास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT