Latest

लता मंगेशकर यांना मुलगी मानायचे अटल बिहारी वाजपेयी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर लता मंगेशकर यांनी त्यांच्याविषयी आठवणी सांगितल्या होत्या. त्यांनी त्यावेळी ट्विट करून अटल बिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहत भावना व्यक्त केल्या होत्या. लता मंगेशकर आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे चांगले संबंध होते. एका वेबसाईटशी बोलताना लता यांनी अटलजींच्या आठवणी सांगितल्‍या होत्या.

लता मंगेशकर म्‍हणाल्‍या होत्या, 'मला वाटतयं की, भारतमधून एक साधु पुरुष गेला. ते खूप उत्तम लेखक आणि कवी होते. अटलजी यांच्‍या भाषणात सर्व काही सत्‍य असायचं, ते चांगले व्‍यक्‍ती होते. त्‍यांनी कुणाचं कधीही मन दुखावलं नाही. मी त्‍यांना माझ्‍या वडिलांप्रमाणे मानत होते. जेव्‍हा मी त्‍यांना म्‍हणाले, मी आपल्‍याला माझ्‍या वडिलांप्रमाणे मानते. हे ऐकून ते म्‍हणाले होते की, मी देखील आपल्‍याला माझी मुलगी मानतो. त्‍यानंतर मी त्‍यांना 'दद्‍दा' म्‍हणू लागले. ते माझ्‍या प्रेम करत होते. ते सगळ्‍यांवर प्रेम करत होते.'

'१९४२ मध्‍ये माझ्‍या वडिलांचा मृत्‍यू झाला होता, आज तितकाच मोठा धक्‍का मला बसला आहे,' असे लताजी म्‍हणाल्‍या.

लता मंगेशकर यांनी एक आठवण सांगितली की, 'ज्‍यावेळी आम्‍ही आमच्‍या वडिलांच्‍या नावे एक हॉस्‍पिटल उभारले होते. त्‍यावेळी हॉस्‍पिटलच्‍या उद्‍घाटनाला अटल बिहारी वाजपेयींना आमंत्रित केलं होतं. उद्‍घाटन समारंभाच्‍या शेवटी त्‍यांनी भाषण केलं होतं. ते म्‍हणाले होते, आपलं हॉस्‍पिटल चांगले चालावे, अशा शुभेच्‍छा मी देणार नाही. कारण, अशा शुभेच्‍छा देण्‍याचा अर्थ लोक आजारी पडू देत असा होईल. हे ऐकून मी पुढे काही बोलू शकले नाही.'

२०१४ मध्ये लता मंगेशकर यांनी 'अंतर्नाद'मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांना आपला सुरेल आवाज दिला होता. यामध्ये वाजपेयी यांच्या निवडक कविता समाविष्ट करण्यात आल्या होत्या. त्या कविता खुद्द वाजपेयी यांच्याही खूप खास कविता होत्या. 'अंतर्नाद' एक अल्बम होता. हा अल्बम अटल बिहारी वाजपेयीद्वारा लिहिण्यात आलेल्या कवितांना समर्पित होता.

स्वर कोकिळा लता यांनी अटलजींची कविता 'ठन गई मौत से' ला आपला स्वरसाज चढवला होता.

अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन १६ ऑगस्ट, २०१८ रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात झालं होतं. दीर्घकाळ आजारानंतर वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता.

'मौत से ठन गई'…चे बोल पुढीलप्रमाणे असे –

'मौत से ठन गई'…
ठन गई!

मौत से ठन गई!

जूझने का मेरा इरादा न था,
मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था,
रास्ता रोक कर वह खड़ी हो गई,
यूं लगा जिंदगी से बड़ी हो गई.

मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं,
जिंदगी सिलसिला, आज कल की नहीं.
मैं जी भर जिया, मैं मन से मरूं,
लौटकर आऊंगा, कूच से क्यों डरूं?

तू दबे पांव, चोरी-छिपे से न आ,
सामने वार कर फिर मुझे आजमा.
मौत से बेखबर, जिंदगी का सफ़र,
शाम हर सुरमई, रात बंसी का स्वर.

बात ऐसी नहीं कि कोई ग़म ही नहीं,
दर्द अपने-पराए कुछ कम भी नहीं।
प्यार इतना परायों से मुझको मिला,
न अपनों से बाक़ी हैं कोई गिला.

हर चुनौती से दो हाथ मैंने किए,
आंधियों में जलाए हैं बुझते दिए.
आज झकझोरता तेज़ तूफ़ान है,
नाव भंवरों की बांहों में मेहमान है.

पार पाने का क़ायम मगर हौसला,
देख तेवर तूफ़ां का, तेवरी तन गई.

-अटल बिहारी वाजपेयी

हेही वाचा

SCROLL FOR NEXT