आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक 2031 मध्ये होणार नष्ट | पुढारी

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक 2031 मध्ये होणार नष्ट

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची उलटी गणती सुरू केली आहे. सन 2031 मध्ये हे अंतराळ स्थानक प्रशांत महासागरात पाडून ही मोहीम थांबवली जाणार आहे. अलीकडेच ‘नासा’ने याबाबतच्या आपल्या व्यापक योजनेची विस्ताराने माहिती दिली आहे.

‘आयएसएस’ला अंतराळातील उपकरणांचे ‘कब—स्तान’ म्हटल्या जाणार्‍या ‘पॉईंट निमो’ येथे क्रॅश केले जाणार आहे. हा प्रशांत महासागराचा एक दूरस्थ भाग आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ट्रान्झिशन रिपोर्टनुसार ‘नासा’च्या बजेट अनुमानांचा विचार करता जानेवारी 2031 मध्ये ‘आयएसएस’ला ‘डी-ऑर्बिट’ केले जाईल. याचा अर्थ त्याला कक्षेतून बाहेर काढले जाईल.

त्यानंतर ते पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून प्रशांत महासागराच्या ‘पॉईंट निमो’ मध्ये स्प्लॅश लँडिंग करील. हे ठिकाण जमिनीपासून सुमारे 2700 किलोमीटर अंतरावर आहे. अनेक निवृत्त किंवा निकामी अंतराळयाने, अवकाश प्रयोगशाळांना याठिकाणी कायमची जलसमाधी दिली जाते. या ठिकाणाचे नाव फ्रेंच कादंबरीकार जूल्स वर्ने यांच्या ‘टे्ंवटी थाऊजंड लिग्ज अंडर द सी’ या प्रसिद्ध पाणबुडी नाविकाच्या नावावरून देण्यात आले आहे.

जमिनीपासून सर्वाधिक अंतरावर असलेले हे सुरक्षित ठिकाण आहे. याठिकाणी 263 पेक्षाही अंतराळयानांना जलसमाधी देण्यात आलेली आहे. सध्या ‘आयएसएस’ पृथ्वीपासून सुमारे 420 किलोमीटर उंचीवरून भ—मण करीत आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या देशांचे दोनशेपेक्षाही अधिक अंतराळवीर तिथे राहून आलेले आहेत.

हेही वाचा

Back to top button