Latest

Asteroid Near Earth : ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पेक्षाही मोठ्या अशनीचा पृथ्वीला धोका; ‘या’ दिवशी धडकण्याची शक्यता

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क: नासा ही संस्था अवकाशातील अशनीच्या विक्षेपण तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहे. यावेळी असे आढळून आले की, स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षाही मोठा एक अशनी पृथ्वीच्या दिशेने येत आहे. हा अशनी जवळपास 210 मीटर उंच असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजेच 192 मीटर उंची असणाऱ्या गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षाही या अशनी मोठ्या आहेत. त्यामुळे सध्या पृथ्वीवर मोठे संकट कोसळण्याची शक्यता आहे. (Asteroid Near Earth)

सुमारे 4.6 अब्ज वर्षांपूर्वीच्या सूर्यमालेच्या निर्मितीतील शिल्लक राहिलेल्या तुकड्यांपैकी एक या अशनी आहेत. नासाच्या Joint Propulsion Laboratory (JPL) नुसार जेव्हा एखादी वस्तू सूर्यापासून पृथ्वीपर्यंतच्या अंतराच्या ( पृथ्वी-सूर्य अंतर= 93 दशलक्ष) 1.3 पट कमी असते तेव्हा ती पृथ्वीच्या अगदी जवळ असते असा निष्कर्ष काढला जातो. (Asteroid Near Earth)

2005 RX3 या अशनी 18 सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळ येईल आणि ताशी 62,820 किलोमीटर इतक्या वेगाने धडकेल. म्हणजेच या अशनी 47,42,252 किलोमीटर इतक्या पृथ्वीच्या जवळ असतील.

यापूर्वी 2005 रोजी एक लघुग्रह पृथ्वीच्या जवळ आला असल्याचे JPL या नासाच्या संस्थेने केलेल्या संशोधन रिपोर्टनूसार सांगितले जाते. या अशनी पृथ्वीला धडकून पुढे निघून जातील आणि मार्च 2036 ला पुन्हा पृथ्वीच्या दिशेने परत येईल.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT