Latest

Assam Murder : प्रियकराच्या मदतीने केला पतीसह सासूचा खून; मृतदेहाचे तुकडे ठेवले फ्रिजमध्ये

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका महिलेने प्रियकराच्या मदतीने नवऱ्यासह सासूचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान खून करुन मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये लपवल्याची माहिती समोर आली. आसामच्या गुवाहाटीमध्ये ही घडली. आरोपी महिलेच्या प्रियकराचा देखील या खूनात सहभाग होता. त्यामुळे अनैतिक संबंधांमधून हे खून झाले असल्याची माहिती समोर आली आहे. (Assam Murder)

Assam Murder : मृतदेहाचे तुकडे तीन दिवस फ्रीजमध्ये

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपी महिलेचे नाव वंदना कलिता असे आहे. या महिलेने पती अमरज्योती डे आणि सासू शंकरी डे यांचा खून केला. यानंतर दोन्ही मृतदेहांचे तुकडे केले आणि फ्रीजमध्ये लपवून ठेवले. तिचा प्रियकर आणि तिने हे मृतदेह खून केल्याच्या तीन दिवसांनंतर गुवाहाटीपासून १५० किमी अंतरावर असलेल्या मेघालयातील चेरापुंजी नेले.

मृतदेहांच्या शोधात पोलीस चेरापुंजीत

एका पोलीस अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वंदनाने हा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आसाममधील मेघालय येथील चेरापुंजी येथील घटनास्थळी भेट दिली. जिथे आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराने सासू आणि नवऱ्याच्या शरीराचे अवयव फेकून दिले होते.

श्रद्धा आणि निक्की यादव यांच्या खूनात देखील फ्रीज कनेक्शन

आसाममधील हे प्रकरण गेल्या वर्षी दिल्लीत श्रद्धा वालकरचा प्रियकर आफताब पूनावाला याने केलेल्या हत्येप्रमाणेच आहे. त्यांचा मृतदेह देखील तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता. निक्की यादव या आणखी एका महिलेचाही तिचा साथीदार साहिल गेहलोत याने खून केला होता. त्यानंतर तिचा मृतदेह त्याच्या दिल्लीतील रेस्टॉरंटमध्ये फ्रिजमध्ये ठेवण्यात आला होता.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT