Latest

Asian Scientist : आशियातील सर्वोत्तम संशोधकांमध्ये पाच मराठी!

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सिंगापूर येथून प्रसिद्ध होत असलेल्या संशोधन क्षेत्रातील नियतकालिक 'एशियन सायंटिस्ट' आशियातील खंडातील 100 सर्वोत्तम संशोधकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 5 मराठी संशोधकांचा समावेश आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेली ही यादी सार्‍या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे. हे नियतकालिक 2016पासून दरवर्षी ही यादी जाहीर करत असते.

या यादीत मुंबईतील 3, पुण्यातील 1 तर मूळचे अकोल्याचे असलेल्या एका संशोधकाचा समावेश आहे. पद्मश्री पुरस्कार विजते डॉ. जी. डी. यादव यांचाही या यादीत समावेश आहे. यादव रसायन शास्त्रातील दिग्गज संशोधक मानले जातात. ते मुंबईतील सुप्रसिद्ध इंडियन इन्सिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलुगुरू आहेत. यादव हे मूळचे कोल्हापूरचे आहेत.

या यादीत समावेश असलेले रवींद्र कुलकर्णी हे पुण्याचे आहेत. एलकाय केमिकल्स या कंपनीचे ते संस्थापक आहेत. यूएस नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगवर ते इंटरनॅशल फेलो म्हणून कार्यरत आहेत. यादीत गणितज्ज्ञ महेश काकडे यांचा समावेश आहे. महेश काकडे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये कार्यरत आहेत. ते मूळचे अकोल्याचे आहेत. काकडे यांना 2022 चा इन्फोसिस पुरस्कार मिळाला आहे.

टाटा फंडामेंटल रिसर्चच्या दोघांचा समावेश

याच यादीत मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्समधील संशोधक निस्सिम कानेकर आणि विदिता वैद्य यांचा समावेश आहे. कानेकर एरोस्पेस आणि खगोलशास्त्र या विषयात संशोधन करतात. त्यांना 2022 चा इन्फोसिस पुरस्कारही मिळाला आहे, तर वैद्य यांना 2022 चा इन्फोसिस पुरस्कार, 2015 चा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला आहे. त्या लाईफ सायन्स क्षेत्रात संशोधन करतात.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT