Latest

Asian Para Games : सोलैराज धर्मराजची विक्रमासह ‘लांब उडी’; भारतासाठी जिंकले २५ वे सुवर्णपदक

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: एशियन पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची पदकांची लूट सुरूच आहेत. आज पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी करत पदकांचा दबदबा कायम ठेवला आहे. चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये  सोलैराज धर्मराजने लांब उडीत देशाला २५ वे सुवर्ण पदक मिळवून दिले. एशियन पॅरा गेम्समधील भारताचे हे २५ वे सुवर्णपदक आहे. (Asian Para Games)

पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या लांब उडी T64 प्रकारात सोलैराज धर्मराजने  ६.८0 अशी सर्वोत्कृष्ट लांब उडी घेत, सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच सोलैराज धर्मराज या पॅरा – अॅथलीटने ६.८0 अशी उडी घेऊन नवीन आशियाई आणि पॅरा गेम्समध्ये नवीन विक्रम रचला आहे. दरम्यान भारत पॅरा गेम्स, २०२३ मध्ये पदकांची शतकपूर्ती करण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे. सोलैराज धर्मराजने लांब उडीत मिळवलेले सुवर्ण हे भारताचे ९८ वे पदक आहे. (Asian Para Games)

Asian Para Games : पॅरा गेम्समध्ये भारत रचणार नवीन इतिहास

आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये भारतीय खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी सुरू आहे. त्यामुळे भारताच्या वाढत्या पदकतालिकेत भर पडत आहे. आतापर्यंत भारताने एकूण ९८  पदके मिळवली आहेत. भारत लवकरच पॅरा गेम्समधील १०० पदकांचा टप्पा पार करणार आहे. भारत या नवीन विक्रमाच्या अगदी जवळ आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT