Latest

Asian Para Games: अभिमानास्पद! आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने रचला इतिहास; ७३ पदकांची कमाई

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: एशियन पॅरा गेम्स, २०२३ मध्ये भारताने दमदार कामगिरी करत नवीन इतिहास रचला आहे. यंदाच्या पॅरा गेम्समध्ये भारताने आतापर्यंत एकूण ७३ पदकांची कमाई केली आहे. भारतीय खेळाडूंकडून अजूनही पदकांची कमाई सुरूच आहे. ही देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. या संदर्भातील माहिती 'भारतीय क्रीडा प्राधिकरण'ने (SAI Media) त्यांच्या अधिकृत 'X' अकाऊंटवरू दिली आहे. (Asian Para Games)

पॅरा बॅडमिंटनमध्ये 'नित्या श्री' हिने तिच्या अद्भूत खेळीने कास्यंपदक जिंकले. तिने भारतासाठी ७३ वे पदक जिंकत एक नवीन इतिहास रचला आहे, असे SAI Media ने म्हटले आहे. एशियन पॅरा गेम्समध्‍ये भारताने गुरुवारी चीनमधील हांगझोऊ येथे १६ वे सुवर्ण जिंकल्यानंतर भारताने आतापर्यंतची सर्वोच्च सुवर्णपदकांची नोंद केली आहे. सचिन सर्जेराव खिलारीने पुरुषांच्या F-46 शॉटपुटमधून भारतासाठी विक्रमी सुवर्णपदक जिंकले, जिथे त्याने खेळाचा विक्रम नोंदवला. आशियाई पॅरा गेम्स २०१८ मध्ये भारताने सर्वोत्तम कामगिरी करत, १५ सुवर्णपदके जिंकली होती. त्यानंतर यावर्षी भारताच्या खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करत १६ सुवर्ण आपल्या नावावर केली आहेत. (Asian Para Games)

पॅरा गेम्सम भारताला ७३ पदके पीएम मोदींकडून अभिनंदन

जकार्ता २०१८ आशियाई पॅरा गेम्समधील आमचा मागील ७२ पदकांचा विक्रम मोडून, भारताने अभूतपूर्व ७३ पदके जिंकून आणि अजूनही मजबूत करत आशियाई पॅरा गेम्समधली एक अतुलनीय कामगिरी केली आहे. हा महत्त्वाचा प्रसंग आमच्या खेळाडूंच्या अथक निर्धाराला मूर्त रूप देतो. आमच्या अपवादात्मक पॅरा-अॅथलीट्ससाठी एक गर्जना करणारा जल्लोष ज्यांनी इतिहासात आपले नाव कोरले आहे. यावेळी प्रत्येक भारतीयाचे हृदय प्रचंड आनंदाने भरून गेले आहे. खेळाडूंची बांधिलकी, दृढता आणि उत्कृष्टतेची अटळ मोहीम खरोखरच प्रेरणादायी आहे. ही ऐतिहासिक कामगिरी भावी पिढ्यांना मार्गदर्शक प्रकाश, प्रेरणादायी ठरू दे, असेही पीएम मोदी यांनी म्हटले आहे. या संदर्भातील पोस्ट पीएम मोदी यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून केली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT