Latest

Asian Games 2023 : तिरंदाजीत ओजस देवतळेची सुवर्ण तर अभिषेक वर्माची रौप्य पदकावर मोहोर

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुरुषांच्या तिरंदाजीमध्ये भारताने सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके जिंकली आहेत. पुरुषांच्या तिरंदाजीचा अंतिम सामना भारताच्या दोन खेळाडूंमध्ये झाला. या सामन्यात भारताच्या ओजस देवतळेने सुवर्ण आणि अभिषेक वर्माने रौप्यपदक पटकावले. भारताचे हे ९८वे आणि ९९वे पदक आहे.

संबंधित बातम्या : 

कंपाऊंड तिरंदाजीमध्ये भारत विरुद्ध भारत यांच्यातील हा सामना होता. अंतिम फेरीत दोन भारतीय तिरंदाजांमध्ये लढत होती. अशा स्थितीत देशाला दोन्ही पदके मिळण्याची खात्री होती, पण पदकाचा रंग दोघांनाही वैयक्तिकरित्या ठरवायचा होता. कंपाऊंड पुरुषांच्या वैयक्तिक तिरंदाजीच्या अंतिम फेरीत ओजस देवतळे दुसऱ्या सेटनंतर अभिषेक वर्मावर ६०-५९ असा पुढे होता. अभिषेकने सहाव्या प्रयत्नात ९ गुण मिळवले. ओजसने छान सुरुवात केली. यापूर्वी दोन्ही खेळाडूंनी ३०-३० धावा केल्या होत्या. तिसर्‍या सेटनंतर ओजस ११९-११७ ने पुढे राहिला. ओजसने १४९ गुणांसह सुवर्ण आणि अभिषेकने १४७ गुणांसह रौप्यपदक जिंकले. यासह भारताची ९९ पदके पूर्ण झाली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT