Latest

राजस्‍थानमध्‍ये काँग्रेसने दिले जातनिहाय सर्वेक्षणाचे आश्‍वासन, निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस पक्षाने आज ( दि.२१) राजस्थान विधानसभा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. ( Congress's Rajasthan poll manifesto ) आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेत आल्यास जातनिहाय सर्वेक्षण करण्याचे आश्वासन पक्षाच्‍या वतीने देण्‍यात आले आहे.

कार्यक्रम काँग्रेसचे अध्‍यक्ष मल्‍लिकार्जून खर्गे, मुख्‍यमंत्री अशोक गेहलोत, माजी उपमुख्‍यमंत्री सचिन पायलट आदी नेत्‍याच्‍या उपस्‍थितीत निवडणूक जाहीरनाम्‍याचे प्रकाशन झाले. (Congress's Rajasthan poll manifesto )

काँग्रेसने राजस्‍थानमधील जाहीरनाम्‍यात चिरंजीवी आरोग्य विम्याची रक्कम 25 लाखांवरून 50 लाख रुपये करण्याची ग्‍वाही दिली आहे. तसेच ४ लाख सरकारी नोकर्‍या, शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज, पिकांना किमान आधारभूत किंमतीसाठी नवा कायदा आणि ४०० रुपयांना घरगुती सिलिंडर आदी आश्‍वासनांचाही या जाहीरनाम्‍यात समावेश आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT