Latest

Australian Open women’s final 2024 | बेलारूसच्या आर्याना सबालेन्काची सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनवर मोहोर

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ च्या बहुप्रतिक्षित महिला एकेरीच्या अंतिम फेरीत द्वितीय मानांकित बेलारूसच्या आर्याना सबालेन्का हिने चीनच्या १२व्या मानांकित क्विनवेन झेंग हिचा पराभव करत विजेतेपद पटकावले. आर्यानाने किनवेनला ६-३, ६-२ अशा सरळ सेटमध्ये हरवले. आर्यानाने ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ स्पर्धेचे महिला एकेरीची विजेतेपद पटकावले होते. आता तिने दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदावर मोहोर उमटवली आहे.

आर्याना सबालेन्काने विजेतेपद राखण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत दमदार सुरुवात केली होती. तिने क्विनवेन झेंग विरुद्ध पहिला सेट ६-३ असा जिंकला. त्यानंतर सबालेन्काने खेळावर वर्चस्व राखत झेंगला दुसऱ्या सेटमध्येही संधी दिली नाही. तिने दुसरा सेटमध्ये ६-२ ने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सबालेन्का ५-२ ने आघाडीवर होती. यावेळी झेंगने चिवट झुंज देत तिची सर्व्हिस ब्रेक करण्याचा प्रयत्न केला. पण सबालेन्काने सर्व्हिस कायम ठेवत ऑस्ट्रेलियन ओपनवर मोहोर उमटवली.

२०१३ नंतर ऑस्ट्रेलियन ओपनचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवणारी ती पहिली महिला ठरली आहे. तिचे हे दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT