पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली याला वनडे फॉरमॅटमधील पुरुषांमध्ये स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) याची आज घाेषणा केली. ( ICC Men's ODI Cricketer of the Year ) त्याने २०२३ या वर्षात 72 पेक्षा जास्त सरासरीने 1377 धावा केल्या हाेत्या.
विराट कोहली हा ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 मधील स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. विराटने २०२३ विश्वचषक स्पर्धेत विक्रमी धावसंख्या गाठली. तसेच २०२३ या वर्षात तयाने एकुण २७ सामन्यात 27 सामन्यात 1377 धावा फटकावत, 1 बळी आणि 12 झेलही आपल्या नावावर केले.
२०२३ विश्वचषक स्पर्धेत त्याने ११ डावांपैकी ९ डावांमध्ये अर्धशतक झळकावले. या स्पर्धेत त्याने एकुण 765 धावा केल्या, पुरुष क्रिकेट विश्वचषकात वैयक्तिक फलंदाजाने केलेल्या आतापर्यंतच्या त्या सर्वाधिक धावा ठरल्या. त्याने 2003 मध्ये सचिन तेंडुलकरने केलेला विक्रमही मोडला होता.
विश्वचषक स्पर्धेत कोहलीने 95.62 च्या सरासरीने आणि 90.31 च्या स्ट्राइक रेटसह तीन शतके झळकावली.त्याने उपांत्य फेरीत आपल्या खेळीसह 50 एकदिवसीय शतकांची विक्रमी नोंद पूर्ण केली. वन-डे फॉरमॅटच्या सर्वाधिक शतके आपल्या नावावर करणारा तो फलंदाज ठरला होता.