India vs England 1st Test Day 3 | ओलीचे झुंझार शतक, इंग्‍लंडला दुसर्‍या डावात १२६ धावांची आघाडी | पुढारी

India vs England 1st Test Day 3 | ओलीचे झुंझार शतक, इंग्‍लंडला दुसर्‍या डावात १२६ धावांची आघाडी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसाेटी मालिकेतील पहिल्या सामन्‍यातील आजचा ( दि. २७) तिसरा दिवस भारतीय गोलंदाजांसह इंग्‍लंडचा फलंदाज ओली पोपने गाजवला. हैदराबाद कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव २४६ धावांवर आटोपला होता. त्यानंतर भारताने पहिल्या डावात ४३६ धावा करुन १९० धावांची आघाडी घेतली. भारताचा पहिला डाव सर्वबाद ४३६ धावांवर आटोपला. (India vs England 1st Test Day 3) भारताने १९२ धावांची आघाडी घेतली होती. तिसर्‍या दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज बुमराहसह फिरकीपटूंनी दुसर्‍या डावात इंग्‍लंडचे सहा गडी तंबूत धाडले. मात्र ओली पोपच्‍या झुंझार शतकी खेळीने दुसर्‍या डावात इंग्‍लंडने १२६ धावांची आघाडी घेतली आहे.

India vs England 1st Test Day 3 : १६३ धावांवर इंग्‍लंडचा निम्‍मा संघ तंबूत

दुसऱ्या डावात आर. अश्विनने झॅक क्रॉलीला बाद करत इंग्‍लंडला पहिला धक्‍का दिला. लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने १ बाद ८९ धावा केल्या. मात्र लंचनंतर बुमराहची जादू चालली त्‍याने इंग्‍लंडचा डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न करणार्‍या बेन डकेटला ४७ धावांवर बाद कले. यानंतर त्‍याने जो रुटला पायचीत ( एलबीडब्ल्यू ) करत इंग्‍लंडला तिसरा धक्‍का दिला.  दुसऱ्या डावात जॉनी बेअरस्टो पुन्‍हा अपयशी ठरला.  रवींद्र जडेजाने बेअरस्टोला क्लीन बोल्ड केले. त्‍याने 24 चेंडूत 10 धावा केल्‍या. इंग्लंडला 141 धावांवर चाैथा झटका बसला. इंग्लंडला 163 धावांवर पाचवा धक्का बसला. अश्विनने कर्णधार बेन स्टोक्सला क्लीन बोल्ड ( त्रिफळाचीत)    केले. त्‍याने केवळ ६ धावांचा योगदान दिले. एकीकडे इंग्‍लंडचे दिग्‍गज फलंदाज तंबूत परतत असताना ऑली पोप याने अर्धशतकी खे‍ळी करत  इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. टी ब्रेकपर्यंत इंग्‍लंडने दुसर्‍या डावात ५ गडी गमावत १७२ धावा केल्‍या.

India vs England 1st Test Day 3 : ऑली पोपचे झुंझार शतक

इंग्लंडच्या ऑली पोपने 154 चेंडूत शतक झळकावले. त्‍याचे कसोटी कारकिर्दीतील हे पाचवे शतक ठरले आहे.  तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्‍हा  ओली २०८ चेंडूत १७ चौकारांच्‍या मदतीने १४८ धावांवर तर रेहान अहमद १६ धावांवर नाबाद राहिले.  या खेळीमुळे  इंग्‍लंडला दुसर्‍या डावात १२६  धावांची आघाडी मिळविण्‍यात यश आले.

अक्षरने केली ११२ धावांची भागीदारी ब्रेक

फिरकीपटू अक्षर पटेल याने ऑली पोप आणि बेन फॉक्‍स यांची ११२ धावांची भागीदारी तोडली. त्‍याने फॉक्‍सला क्‍लीन बोल्‍ड केले. यानंतर  रेहान अहमदने याने संयमित फलंदाजीचे प्रदर्शन करत ऑली पोपला साथ दिली.

भारताला पहिल्‍या डावात १९० धावांची आघाडी

शुक्रवारी ( दि.२६) दुसऱ्या दिवसाअखेर भारताने ७ विकेट गमावत ४२१ धावा केल्याहोत्या. भारताची दुसऱ्या दिवसाअखेर १७५ धावांची आघाडी घेतली होती; पण तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु होताच सुरुवातीला तीन गडी बाद करत इंग्लंडने भारताला ४३६ धावांवर रोखले. रवींद्र जडेजाला रूटने एलबीडब्ल्यू केले. त्याने ८७ धावा केल्या. त्यानंतर आलेला बुमराह शुन्यावर माघारी परतला. त्यानंतर रेहान अहमदने अक्षर पटेलला आउट केले. अक्षरने ४४ धावा केल्या.

इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर टॉम हार्टली आणि रेहान अहमदने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. जॅक लीचने एक विकेट घेतली. (India vs England 1st Test Day 3)

याआधी यशस्वी जैस्वालने ८० धावांची खेळी केली. तर केएल राहुलने कसोटी कारकिर्दीतील १४वे अर्धशतक झळकावले होते. पण तो ८६ धावांवर तो हार्टलीकरवी रेहान अहमदकडे झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी राहुलने रवींद्र जडेजासोबत ६५ धावांची भागीदारी केली. यानंतर जडेजा आणि केएस भरत यांनी जबाबदारी स्वीकारली आणि दोघांनी ६८ धावांची भागीदारी केली. पण जो रूटने केएस भरतला एलबीडब्ल्यू आऊट केले. भरतला ४१ धावा करता केल्‍या.

Back to top button