Latest

Arun Gawli Will Be Released| मोठी बातमी : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार, हायकोर्टाचा आदेश

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपुरातील मध्यवर्ती कारागृहातून मुदतपूर्व सुटका करा असे  निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज शुक्रवारी दिले आहेत. त्यामुळे कुख्यात गुंड अरुण गवळी याला मोठा दिलासा मिळाला आहे. (Arun Gawli Will Be Released)

2006च्या एका शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. अरुण गवळीच्या त्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने शुक्रवारी अरुण गवळी यांची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्यासंदर्भात उत्तर देण्यासाठी कारागृह प्रशासन आणि गृह विभागाला चार आठवड्यांचा अवधी दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर या निर्णयामुळे गवळीला दिलासा मिळाला  तरी चार आठवड्यानंतरच सुटका होणार असून राज्य सरकार अपिलात गेल्यास पुन्हा ती सुटका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. Arun Gawli Will Be Released)

हायकोर्टाकडून सुटकेचा आदेश, जेल प्रशासन काय निर्णय घेणार?

गँगस्टर अरुण गवळीच्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पुर्ण झाली होती. मात्र, कोर्टानं निकाल राखून ठेवला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयानं अरुण गवळी यांची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही दिला आहे. आता जेल प्रशासन काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काय आहे गवळीचे प्रकरण

मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात तसेच इतर गुन्हेगारी कृत्य यासाठी गवळीला दोन वेळेस जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सध्या अरुण गवळी नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. 2006 च्या महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकानुसार, जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांनी जन्मठेपेची शिक्षा 14 वर्ष तुरुंगवास पूर्ण केल्यावर, तसेच त्यांचे वय 65 पेक्षा जास्त असल्यावर तुरुंगातून सोडता येईल. गवळीचा जन्म 1955 चा असल्याने त्याचे वय सध्या 70 वर्षांवर आहे.

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी १६ वर्ष तुरुंगातच

जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळी  सलग 2007 पासून तुरुंगात असल्याने सोळा वर्ष तो तुरुंगातच आहे. म्हणजेच  2006 च्या महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकानुसार सुटकेसाठीच्या दोन्ही अटी अरुण गवळीने पूर्ण केल्या आहेत.त्यामुळे न्यायालयाने त्याची  मुदतपूर्व सुटका करण्यात यावी असा निर्णय दिल्याची माहिती अरुण गवळी यांचे वकील  मीर नगमान अली यांनी न्यायल्याबाहेर माध्यमांशी बोलताना दिली.

काय आहे २००६ चा शासन निर्णय काय?

वयाची 65 वर्षे पूर्ण झालेल्या अशक्त, निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेत सूट मिळते. त्यानुसारच डॉन अरुण गवळीची शिक्षेतून मुदतीपूर्व सुटकेची मागणी केली होती आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे ही वाचा:

SCROLL FOR NEXT