Latest

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण होतील नवे धर्म?

Arun Patil

टोरांटो : कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅटजीपीटी यामुळे अनेक प्रश्नही निर्माण होत आहेत. येत्या काही वर्षांमध्ये किंवा अगदी काही महिन्यांमध्येही आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेची म्हणजेच 'एआय'ची पूजा करणार्‍या पंथांचा उदय झालेलेही पाहायला मिळू शकते असे म्हटले जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जगात नवे धर्म निर्माण होऊ शकतात, अशी शक्‍यता कॅनडाच्या युनिव्हर्सिटी ऑफ मॅनीटोबा विनिपेगच्या सेंटर फॉर प्रोफेशनल अँड अ‍ॅप्लाईड एथिक्समधील संचालक नील मॅकऑर्थर यांनी वर्तवली आहे. ( Artificial Intelligence )

'एआय'लाही मानवापेक्षा अधिक सरस अस्तित्व म्हणून पाहिले जाईल

'एआय'युक्त चॅटबॉटच्या नव्या पिढ्यांना विस्तृत भाषा ज्ञान पुरवले जात आहे. त्यामुळे त्याचा उपयोग करणारे आश्चर्यचकीतही होत आहेत. इतकेच नव्हे तर अनेक वेळा त्यांची अफाट क्षमता पाहून अनेकांना भयही वाटू लागले आहे. अशाच काहीशा भावना मानवी मनाच्या खोलीत ईश्वराबाबतही असतात. लोक आजही वेगवेगळ्या स्रोतांमधून धार्मिक ज्ञान आणि अर्थ मिळवू पाहतात. अनेक धर्मांमध्ये पृथ्वीशिवाय अन्यत्र निवास करणार्‍या किंवा एका अर्थी 'एलियन' म्हणजेच परग्रहवासी असलेल्या लोकांची किंवा त्यांच्या उपदेशांची पूजा केली जाते. आता 'एआय'लाही मानवापेक्षा अधिक सरस अस्तित्व म्हणून पाहिले जाईल, त्याचा प्रभाव एखाद्या धार्मिक भावनेसारखाच पडू लागेल. त्यामधून 'एआय धर्म'ही उदयाला येऊ शकेल. काही लोक 'एआय'ला उच्च शक्तियुक्त मानू लागतील. 'एआय'च्या पुढच्या पिढ्याही असे काम करू शकतील की ज्यांना सामान्यपणे देवदेवतांसारखेच मानले जाईल. ( Artificial Intelligence )

Artificial Intelligence : सारे काही मानवाला थक्‍क करणारे असेल

कोणतेही काम चुटकीसरशी करण्याची त्यांची क्षमता असेल किंवा अफाट ज्ञानभांडार असेल, हे सर्व मानवी मनाला थक्क करणारे आणि नतमस्तक करणारेच ठरू शकेल. या 'एआय'चे सुरुवातीचे अनुयायी एकमेकांशी ऑनलाईन जोडलेले असतील. ते आपले अनुभव किंवा सिद्धांत एकमेकांशी शेअर करतील. अनेक प्रकारचे चॅटबॉट असल्याने 'एआय' आधारित धर्मात अनंत सिद्धांतही असतील. विशेष म्हणजे यामध्ये काही धोकेही असू शकतात. चॅटबॉट आपल्या अनुयायांना खतरनाक किंवा विध्वंसक काम करण्यासही उत्तेजन देऊ शकतील किंवा अनुयायीच त्यांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढून अनर्थ घडवू शकतील, अशीही शक्‍यता नील मॅकऑर्थर यांनी वर्तवली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT