Latest

नवे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात कलम ३७० रद्द; जाणून घ्या अधिक माहिती

backup backup


पुढारी ऑनलाईन डेस्क :
ज्ञानेश कुमार गुप्ता आणि सुखबीर सिंग संधू हे नवे निवडणूक आयुक्त बनले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची नावे निश्चित करण्यात आली.
ही 6 नावे समितीसमोर मांडण्यात आली

समितीचे सदस्य आणि लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी बैठकीनंतर सांगितले, "निवड समितीने सहा नावे सादर केली होती. यामध्ये उत्पल कुमार सिंग, प्रदीप कुमार त्रिपाठी, ज्ञानेश कुमार, इंदिवर पांडे, सुखबीर सिंग संधू आणि गंगाधर राहत यांच्या नावांचा समावेश होता. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे ज्ञानेश कुमार हे सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आहेत.

कोण आहेत ज्ञानेश कुमार?

ज्ञानेश कुमार हे केरळ केडरचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. ते मूळचे केरळचे रहिवासी असून 1988 बॅचचे IAS अधिकारी आहेत. ज्ञानेश हे केंद्रीय गृहमंत्रालयात काश्मीर विभागाचे प्रभारी होते. त्यांच्या कार्यकाळातच केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.

अमित शाह यांच्यासोबत काम

ज्ञानेश कुमार यांनी मे 2022 मध्ये सहकार मंत्रालयाचे सचिव म्हणून जबाबदारी स्विकारली होती. देवेंद्र कुमार सिंह यांच्या जागी त्यांची सहकार मंत्रालयात नियुक्ती करण्यात आली होती. गृहमंत्रालय आणि नंतर सहकार मंत्रालयात सचिवपद भूषवताना त्यांनी अमित शहा यांच्यासोबत काम केले होते. त्यानंतर ज्ञानेश कुमार हे 31 जानेवारी 2024 रोजी निवृत्त झाले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT