Latest

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन

मोहन कारंडे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज (दि.११) दुपारी कोल्हापूर विमानतळ येथे आगमन झाले. मुख्यमंत्र्यांचे स्वागत पालकमंत्री दीपक केसरकर व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, आमदार प्रकाश आबिटकर, प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मठाचे विश्वस्त उदय सावंत यांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT