Latest

आयबीच्या संचालकपदी तपन डेका यांची नियुक्ती, ‘रॉ’ मध्ये सामंत गोयल यांना मुदतवाढ

backup backup

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली :  केंद्र सरकारने इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) संचालकपदी तपन डेका यांची नियुक्ती केली असून 'रॉ' चे संचालक सामंत गोयल यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. तपन डेका हे सध्या आयबीमध्ये मोहीम विभागाचे प्रमुख आहेत. मागील वीस वर्षांपासून ते आयबीच्या सेवेत आहेत.

१९८८ च्या हिमाचल प्रदेश केडरचे अधिकारी असलेल्या तपन डेका यांना ईशान्य भारतातील कामाचा दीर्घ अनुभव आहे. या अनुभवामुळेच गृहमंत्री अमित शहा यांनी डेका यांना सीएए-एनआरसी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावेळी आसाममध्ये पाठवले होते. इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडण्यात डेका यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा तपासही त्यांनी केला होता.

नीती आयोगाच्या सीईओ पदी परमेश्वरन अय्यर…

दरम्यान केंद्र सरकारने नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून परमेश्वरन अय्यर यांची नियुक्ती केली आहे. अय्यर यांची नियुक्ती दोन वर्षासाठी असल्याचे कार्मिक मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. नीती आयोगाचे विद्यमान कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत हे ३०जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर अय्यर हे सूत्रे हाती घेतील.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT