Latest

राष्ट्रवादी नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नामदेव भगत यांची नियुक्ती

मोहन कारंडे

नवी मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांच्यासह सहा नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदी नामदेव भगत यांची नियुक्ती केली. राष्ट्रवादी पक्षाला लागलेल्या गळतीमुळे आगामी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पक्ष सावरण्याचे  मोठे आव्हान नव्या अध्यक्षांपुढे असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून अशोक गावडे यांच्या पक्षांतराबाबतच्या वावड्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचल्या होत्या. माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अशोक गावडे यांना पक्षांतराबाबतचा निर्णय विचारला असता गावडे यांनी कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेऊ, असे मोघम उत्तर दिले. परंतु त्यांच्या या उत्तरावर समाधान न झाल्याने आव्हाड यांनी काय ते स्पष्ट करा, अशी रोखठोक भूमिका घेतल्याने अखेर गावडे यांना पक्ष सोडणार असल्याचे सांगावे लागले. त्यामुळे जिल्हा अध्यक्षांशिवाय पक्ष राहू नये यासाठी आव्हाड यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. यात विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच पक्षातील अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. राष्ट्रवादीने नव्या जिल्हाध्यक्षाची नेमणूक केल्याने शहराध्यक्ष पदाच्या चर्चांना आत्ता पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT